Uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : ठाकरेंपुढील पेच वाढला! आयोगाच्या यादीत ठाकरेंनी पाठवलेले चिन्ह नाहीत

दत्ता लवांडे

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तर निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत ही चिन्हे नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील पेच आणखी वाढला आहे.

(Shivsena Party Symbol Latest Updates)

निवडणूक आयोगाकडे असलेल्या शिल्लक चिन्हांची यादी सध्या समोर आली असून त्यामध्ये शिवसेनेने पाठवलेल्या चिन्हांपैकी एकही चिन्ह नसल्याचं समोर आलं आहे. तर काल आलेल्या आदेशात आयोगाच्या चिन्हांची जी यादी आहे त्यातूनच दोन्ही गटांना हे चिन्ह निवडावे लागणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना यादीत नसलेली चिन्हे कशी मिळणार? जर यादीतील चिन्ह घ्यायचं ठरलं तर कोणतं चिन्ह ठाकरेंना मिळणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हाची यादी पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्हे पाठवण्यात आली आहेत. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांची यादी पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर नाव ठरवण्यात येणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आपली आणि पक्षचिन्हही आपलंच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. तर आता निवडणूक आयोगाने निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर नवे चिन्ह आणि नवे नाव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. पण आता निवडणूक आयोगाच्या यादीत ही चिन्हे नसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरील पेच वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT