एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत अनेक बदल केले जात आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे उजवा हात अशी ओळख असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांच्या ऐवजी आता रवी म्हात्रे यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Right Hand Ravi Mhatre Replaces Milind Narvekar )
मागील काही दिवसांपासून रवी म्हात्रे यांचा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात वावर वाढळा आहे. खरे म्हणजे रवी म्हात्रे मधल्या काही काळात शिवसेनेत फारसे सक्रीय नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडापासून ते शिवसेनेत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.
तर हे रवी म्हात्रे कोण आहेत?
रवी म्हात्रे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे, खास आहेत. ते बाळासाहेबांचे सहाय्यक होते. २००४ पासून ते बाळासाहेबांचे सहाय्यक म्हणून काम पाहत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे ठाकरे कुटुंबियांसोबत होते. त्यानंतर मध्यतरीच्या काळात ते सक्रीय असल्याचं पाहायला मिळालं नाही. (Who Is Ravi Mhatre)
बाळासाहेबांसोबत असताना रवी म्हात्रे यांच्याकडे शाखाप्रमुखांसह, आमदार, खासदार आपल्या समस्या घेऊन रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. त्यावेळी रवी म्हात्रे शिवसैनिकांमधील दुवा होते. याशिवाय, रवी म्हात्रे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करत असत.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याच्या मंचावर उद्धव ठाकरेंच्या मागे रवी म्हात्रे हातात फाईल्स घेऊन उभे असल्याचे पाहायला मिळाले होते.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड करुन बाहेर पडले तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवती एक चौकडी जमली आहे, असा आरोप केला जात होता. आरोपांमध्ये ज्या लोकांची नावे घेतली जात होती. त्यात मिलींद नार्वेकर यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावरील जबाबदारी काहीशी बदलेल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.