Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वीच दिग्गज नेत्याची पक्षातून हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचं काम करत असताना क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांचा फोटो लावला नाही. मुंबईत कधी त्यांची भेटही घेतली नाही. नुकत्याच झालेल्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे याचं नावही घेतलं नाही. ही खंत वाटल्याने क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पाटील यांनी म्हटलं.

मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. आता शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्याआधीच बड्या नेत्याची हकालपट्टी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

जयदत्त क्षीरसागर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र त्यांना त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा समाजाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात! उमेदवार कधी घोषित करणार? जरांगेंनी यादीची तारीख सांगितली!

Who is Tejal Hasabnis: पुण्याच्या लेकीचं न्यूझीलंडविरुद्ध दिसलं 'तेज'! भारतासाठी पदार्पण करणारी कोण आहे तेजल?

NCP Vidhan Sabha List: शरद पवारांचे 'हे' आहेत तरुण तुर्क शिलेदार, पहिल्यांदाच मिळाली संधी; कोण आहेत? वाचा यादी

Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Latest Maharashtra News Updates live : पर्वतीची जागा राष्ट्रवादीकडेच - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT