Chhatrapati shivaji maharaj weapon waghnakh to come home from UK
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं ब्रिटनकडून लवकरच भारतात आणले जाणार आहेत. राज्य सरकार ब्रिटन सरकारसोबत करार करणार असून महाराजांची वाघनखं भारतात आणले जातील. शिवाजी महाराजांची वाघनखं १६ नोव्हेंबर रोजी राज्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ब्रिटनला जाणार आहेत. ब्रिटन सरकारसोबत करार झाल्यानंतर वाघनखं आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं महाराष्ट्रात येतील. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत. विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत. इसवी सन १८१८ ते १८२४ मध्ये ग्रॅण्ड डफ भारतात आला होता. डफला इतिहासाची आणि वस्तू संग्रहाची आवड होती. डफनेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हिस्ट्री ऑफ मराठा हे पुस्तक लिहिलं.
छ. प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनखं ग्रॅण्ड डफला भेट म्हणून दिली होती. त्यानंतर डफने ही वाघनखं लंडनला नेली. डफच्या मृत्यूनंतर त्याच्या वंशजांनी ही वाघनखं विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला दिली. वाघनखं पूर्णपणे पोलादी आहेत. तसेच त्यांना वाघांच्या नखांसारखा आकार आहे. मराठा साम्राज्याच्या काळात अशाप्रकारच्या वाघनखांची निर्मिती केली जात होती.
शिवाजी महाराजांची वाघनखं आता प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये उत्सुकता आहे. महाराजांनी मुघलांविरोधात लढा देत त्यांना सळो की पळो करुन सोडलं होतं. आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नाखे परत देण्याचे मान्य केले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिलीये.(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.