Alcohol: फुकट दारू दिली नाही म्हणून दुकानालाच लावली आग sakal
महाराष्ट्र बातम्या

Alcohol: फुकट दारू दिली नाही म्हणून दुकानालाच लावली आग

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड  सिन्नर फाटा येथील दुकानाला दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याने एकच धावपळ उडाली. नासिक पूना महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक १ मध्ये दुकान क्रमांक २५ आणि २६ मध्ये असलेल्या हिरा वाईन्स या दुकानात दुपारी  ४.३० वाजेच्या सुमारास सोनू भागवत याने फुकट दारू देत नाही म्हणून रागाच्या भरात आग लावली.

दारू फुकट देत नाही म्हणून याचा राग येऊन काउंटरवर पेट्रोल ओतून सोनू भागवत याने आग लावल्याचे मॅनेजर तरुण खत्री यांनी सांगितले. हिरालाल किमतराम कलानी यांच्या मालकीचे देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान असून तरुण खत्री आणि प्रकाश नागदेव त्याठिकाणी मॅनेजर आहेत. विजय सोनकांबळे, सचिन वाघ, चंदन राठोड, हिरामण भडांगे, सुखराम गवारी हे कामाला असून आज सकाळी अकरा वाजता सोनू भागवत हा दारू फुकट दे म्हणून वाद करीत निघून गेला, त्यानंतर दुपारी ४.३० वाजता राग मनात धरून तो हातात पेट्रोल भरलेली बॉटल आणून सोनू याने काउंटरवर ओतून आग लावली.

अचानक झालेल्या या घटनेने एकच धावपळ झाली. आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी न घाबरता तात्काळ पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. मॅनेजर प्रकाश नागदेव यांनी तत्काळ नाशिकरोड अग्नीशमन दलाला फोन केले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे विजय बागुल, रामदास काळे, मनोज साळवे, लक्ष्मीकांत बेंद्रे, प्रथमेश पूरी घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. वेळेवर अग्नीशमन दल पोहोचल्याने मोठा अनर्थ  टळला पण आग आटोक्यात येईपर्यंत दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

आग आटोक्यात आणल्यानंतर आग पुन्हा फैलवू नये म्हणून ब्लोर मशीनच्या सहाय्याने दुकानातील धूर बाहेर काढण्यात आले. दुकानातील काउंटरवर प्लायवूड असल्याने आग लवकर फैलावली, सीलिंग वरील पंखा पूर्णपणे वितळला होता. सुदैवाने आग मागील बाजूस लागली नाही. मद्य पथार्थामुळे मोठी आग लागली असती आणि आग आटोक्यात आणणे मुश्किल झाले असते. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही.

नाशिकरोड परिसरात हॉटेल्स आणि इतर ठिकाणी दुकानांमध्ये फुकट मागणारे दुकानदारांना त्रास देत असून दुकानदार भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही. सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स याठिकाणी आग लावणारा सोनू भागवत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दमबाजी करून फुकट दारू घेण्यावरून वाद करीत असल्याचे मॅनेजर तरुण खत्री याने सांगितले. रविवारी सकाळी दारू फुकट न दिल्याने त्याला राग आला आणि दुपारी सोनू भागवत याने काउंटरवर पेट्रोल ओतून आग आग लावली.

आगीचे वृत्त समजताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलिस उप निरीक्षक अनिल शिंदे , पोलिस उप निरीक्षक सुनील बिडकर, सचिन वाळुंज इतर कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले. अशा प्रकारे फुकट खाऊ गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करीत आहेत.

याप्रकरणी मॅनेजर तरुण खत्री यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित सोनू भागवत याला अटक केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT