shraddha murder case BJP Ashish Shelar serious allegations against Uddhav Thackeray and mva govt shraddha letter  
महाराष्ट्र बातम्या

Shraddha Murder Case: श्रद्धाचे आडनाव वालकर म्हणून की तो…; भाजपचे 'मविआ'वर गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडांने देशाला हदरवून टाकले आहे. या बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान श्रद्धाचा दोन वर्षापूर्वीच एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं असून यावरून आता भाजपने गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी श्रद्धाच्या त्या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? असा थेट सवाल भाजपनेते आशिष शेलार यांनी केला आहे.

2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटले आहे. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहे. यानंतर आशिष शेलारांनी पोलिसांनाच संशयाच्या फेऱ्यात घेतले आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

"श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का?" असा सवाल शेलारांनी केला आहे.

शेलार पुढे म्हणाले की, "नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एका भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. या सर्वांची चौकशी सुरु असताना हे पत्र माध्यमांसमोर आले आहे. या पत्राची रिसिव्हड कॉपी देखील माध्यमांवर दिसत आहे."

शेलारांनी माहाराष्ट्राचे तात्कालिन महाविकास आगाडी सरकावर देखील आरोप केला आहे, ते म्हणाले की, "महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती? श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून?"

आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे, ते म्हणाले की, "सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलिस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT