Sinar Mas Pulp and Paper company investing 10500 crores rupee in raigad maharashtra says devendra fadanvis  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Investment in Maharashtra : रायगडमध्ये येणार १०,५०० कोटींची गुंतवणूक! फडणवीसांनी केली घोषणा

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून अनेक उद्योग प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सिनार मास पल्प अँड पेपर गी कंपनी राज्यात 10, 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान या गुंतवणूकीतून 7 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रायगड जिल्ह्यात 900 हेक्टरवर हा प्रकल्प उभा राहणार असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सिनार मास पल्प अँड पेपर प्रा. लि. कंपनीला जागा वाटप देकारपत्र देण्यात आले. शिंदे यांनी सांगितले की, मे. सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे पहिल्या टप्प्यासाठी 287 हेक्टर जमिनीचे वाटपपत्र दिलं आहे. या उद्योगातून सात हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कंपनीला जागा वाटप देकारपत्र देण्यात आले. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT