Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : येत्या काही तासांत मॉन्सून कोकणात धडकणार; हवामान विभागाची महत्वाची अपटेड

नैऋत्य मॉन्सूनला रोखण्याचे काम यंदा ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने (Cyclone Biparjoy) केले.

सकाळ डिजिटल टीम

कोकणामध्ये विशेषतः दक्षिण पट्ट्यामध्ये मॉन्सूनची हजेरी ७२ तासांमध्ये लागू शकते. दक्षिण पट्ट्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे.

कणकवली : देशाच्या दक्षिणोत्तर भागात सक्रिय होणाऱ्या मॉन्सूनचे (Monsoon) वेळापत्रक लांबणीवर पडले असले तरी येत्या ७२ तासांमध्ये मॉन्सूनला पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज पुणे हवामान खात्याने (Pune Meteorological Department) व्यक्त केला आहे. यामुळे उष्म्याने हैराण सिंधुदुर्गवासीयांना दिलासा मिळणार आहे. शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून आहेत.

नैऋत्य मॉन्सूनला रोखण्याचे काम यंदा ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने (Cyclone Biparjoy) केले. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मॉन्सून लांबला. चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दुबार पेरणीची वेळ तर येणार नाही ना? अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

दक्षिण कोकणामध्ये खरीप हंगामाची पेरणी पावसाळ्यापूर्वी होते. जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये रब्बी हंगामाच्या पीक काढणीनंतर खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी केली जातात. त्यामुळे मेच्या अखेरीस बहुतांश भागात पेरणी झाली. तथापि उत्तर कोकणामध्ये पावसाची प्रतीक्षा ताणली गेली, तरीही काही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मेच्या अखेरीस अर्थात ३० मेपासून भात पेरणीला सुरुवात झाली.

जूनच्या पहिल्या आठवड्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली; पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे १० जून ते १४ जून अशा सलग चार दिवस भात पेरणीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आजअखेर पावसाने पाठ फिरवली आहे. कडक उन्हाळा जाणू लागला आहे.

पावसाने थोडीफार हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईतून मुक्ती मिळाली असली तरी अजूनही नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाही. विहिरींची पातळीही खालावली आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अद्यापही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे भात पेरणीनंतरची स्थिती भयावह आहे. आता थेट म्हणजे मान्सून कोसळल्याशिवाय शेतकऱ्यांना भात पेरणी किंवा लावणीही करता येणार नाही.

पाऊस आणखी काही कालावधीसाठी लांबला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. यासाठी पोषक वातावरण होत आहे. वाऱ्याचा वेग ही समाधानकारक आहे; पण, आद्रता नसल्याने मान्सूनची हजेरी लागत नाही. याचा थेट परिणाम यंदाच्या खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर पाऊस न पडल्यास महागाई वाढणार आहे. शिवाय आताच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत असून सर्वांचे डोळे अबाळाकडे लागले आहेत.

कोकणामध्ये विशेषतः दक्षिण पट्ट्यामध्ये मॉन्सूनची हजेरी ७२ तासांमध्ये लागू शकते. दक्षिण पट्ट्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे; पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक असे वातावरण तयार होत नव्हते, परंतु येत्या ७२ तासात समाधानकारक स्थिती निर्माण होऊन मॉन्सून हजेरी लावेल.

- अनुपम कश्यपी, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा

मॉन्सूनच्या आगमनापूर्वी पारंपरिक पद्धतीने काही नैसर्गिक बदल, जीवजंतू पक्ष्यांमध्ये होत असतात. तसे बदल यंदा फार काही दिसून आले नाहीत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये पाऊस येण्यापूर्वी निसर्गातील प्राणी, पक्षी, कीटक, जलचर प्राण्यांमधील बदल लक्षात येत असत. त्यामुळे पाऊस केव्हा दाखल होणार? याचा अंदाज व्यक्त होत असे; परंतु, ती परिस्थिती सध्या नाही. एकूणच पावसाचे वेळापत्रक बदलत गेल्याने शेतकरीही अंदाज घेऊ शकत नाही.

- सखाराम गावकर, प्रगतिशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT