नाशिक : कधी अॅम्ब्युलन्स (ambulance) तर कधी सरकारी वाहनांच्या ताफ्यांकडून मोठ्याने वाजवला जाणारा सायरनच्या (siren) आवाजाचा प्रश्न कायम आहे. त्यावरही आम्ही अभ्यास करतोय. तसेच पर्याय म्हणून आगामी काळात सायरनऐवजी आकाशवाणीवर वाजणारी धून ऐकू येईल असं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिकमध्ये (ता.४) बोलताना सांगितले.
सायरनऐवजी वाजणार आकाशवाणीची धून?
नागपूरात मेट्रोमुळे प्रवास जलदगतीने होत असला तरीही, त्याच्या आवाजाने नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे साऊंड बॅरिअर्स लावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र,कधी अॅम्ब्युलन्स तर कधी सरकारी वाहनांच्या ताफ्यांकडून वाजवला जाणारा सायरनच्या आवाजाचा प्रश्न कायम आहे. त्यावरही आम्ही अभ्यास करतोय. कधीकाळी आकाशवाणीची पहाटे वाजणारी धून खूप प्रसिद्ध होती. अशी धून सायरनऐवजी वाजल्यास सर्वांना सुसह्य असेल. कारण, मोठ्या आवाजांचा कानांवर आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे सायरनसंदर्भात लवकरच कायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वाहनांचे हॉर्न आता भारतीय वाद्यांच्या स्वरुपात वाजणार असल्याचा कायदा आपण केला आहे. त्यामुळे लवकच बासरी, तबला, माऊथ ऑर्गन असे सुमधून हॉर्न ऐकू येतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.
नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नाशिक व ठाणेकरांच्या पदरात भरभरून गिफ्ट देताना अनेक महिन्यांपासून खाच-खळग्यांमुळे शारीरीक व्याधी तसेच, वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा दिला. नाशिक-मुंबई चार पदरी महामार्गाचे सहा पदरीत रुपांतर करताना संपुर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असून, नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक रोड ते द्वारका या दरम्यान एलिव्हेटेड पद्धतीच्या डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा करतानाच त्यासाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतुद केल्याचे सांगितले.
गडकरींच्या घोषणा
* ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मेट्रोला ध्वनीरोधक यंत्रणा
* पोलिस व्हॅन व ॲम्ब्युलन्सवरील सायरन बंद करणार
* सायरनऐवजी भारतीय वाद्यांच्या धुन लावणार
* शिर्डी-सिन्नर-त्र्यंबक या धार्मिक स्थळांसाठी १०२६ कोटींचा महामार्ग
* सटाणा- मनमाड महामार्गासाठी ३३१ कोटींची तरतुद
* नांदगाव-मनमाड-नस्तनपुर दरम्यान रल्वेवर उड्डाणपुल
* सुरत ग्रीन फिल्डवरून वसईमार्गे वांद्रे-वरळीपर्यंत उड्डाणपुलाचे नियोजन
* मिरा भाईंदर, भिवंडी, बदलापुर येथे लॉजिस्टीक पार्क
* नाशिक शहरापासून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ते विकास.
गडकरींच्या सुचना
* सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गालगत ट्रक टर्मिनस उभारा
* नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपुलाखाली चित्रे काढावी
* राज्याने १६ कोटी रुपये प्रतिहेक्टर भुसंपादनाचा दर कमी करावा
* ग्रीन फिल्डवर स्मार्ट सिटी उभारावी
* नाशिक महापालिकेने लॉजिस्टीक पार्क उभारावे
* डांबरी रस्त्यांवर सिमेंटचा थर लावल्यास रस्ते खड्डेमुक्त
* गुजरात-महाराष्ट्र सरकारने समुद्राला मिळणाऱ्या पाण्याचा वापर करावा
* अपघात कमिटीमार्फत अपघात शुन्य प्रवासासाठी खासदारांनी प्रयत्न करावे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.