मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळं पक्षामध्ये खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनवणी केली आहे. त्यातच त्यांच्या भगिनी आणि दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी देखील या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sister Saroj Patil Comment on Sharad Pawar Resignation on the post of President of NCP)
सरोज पाटील म्हणाल्या, आत्ताची स्थिती भयानक आहे. ईडीचं संकट आहे, संविधान पायदळी तुडवलं जात आहे. या परिस्थितीत शरद पवारांची खूपच गरज आहे. त्यांच्यासारखा दुसरा खंदा विरोधीपक्ष नेता नाही. खरंतर प्रचंड अभ्यास, चांगल्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत. कितीही त्यांच्यावर टीका करा, त्यांनी कोणालाही वाईट शब्दांत उत्तर दिलेलं नाही. इतक्या सुसंस्कृत व्यक्तीमत्वानं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याचं अतिशय दुःख वाटतंय. मला असं वाटतं की, त्यांनी आपला राजीनामा परत घ्यावा.
आता याची दुसरी बाजू म्हणजे, मोह होता कामा नये. मी पुष्कळ वर्षे खुर्चीवर बसलो, आता प्रकृती साथ देत नाही आणि पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे, असंही त्याचं म्हणणं आहे. तुम्ही पर्यायी नेतृत्व तयार करा आणि मगच खुर्ची सोडा, अजून तरी आम्हाला तुमच्यासारखा नेता दिसत नाहीए.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.