Mantralay News sakal
महाराष्ट्र बातम्या

८ महिन्यात सोळाशेंवर शेतकरी आत्महत्या! दुष्काळजन्य स्थितीमुळे कर्जवाटपावेळी बॅंकांचे नियमावर बोट; बळीराजा सावकाराच्या दारात

चिंतेची बाब म्हणजे १ जानेवारी ते २८ ऑगस्टपर्यंत राज्यात अंदाजे सोळाशेंहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची बाब मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात दुष्काळाची छाया गडद झाल्याने बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला आहे. तर काही बॅंका मागील कर्जवसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत. पहिले कर्ज थकीत असल्याने व शेतातील पीक वाया गेल्याने तथा पीक नसल्याने बॅंका नियमावर बोट ठेवत आहेत. चिंतेची बाब म्हणजे १ जानेवारी ते २८ ऑगस्टपर्यंत राज्यात अंदाजे सोळाशेंहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची बाब मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच आता जगण्यासाठी संघर्ष करतोय. सातत्याने अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण, अद्याप त्याच्या सर्व शेतीपिकांना हमीभाव मिळालेला नाही. आता पावसाळ्यातही वरूणराजाने ओढ दिल्याने १९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट आहे.

बहुतेक शेतकऱ्यांचा खरीप वाया गेलेला असतानाही अद्याप त्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. १५ ते २१ दिवसांहून अधिक दिवस पाऊस नसलेल्या महसूल मंडळांमध्ये नाशिक विभागातील १०५, पुणे विभागातील २६७, कोल्हापूरमधील १३९, छत्रपती संभाजीनगरातील ११५, लातूरमधील १७८, अमरावतीतील ८९ आणि नागपूर विभागातील ७ मंडळे आहेत. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.

अशा परिस्थितीमुळे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या ७० हजार कोटींच्या उद्दिष्टातील जवळपास १५ हजार कोटींचे कर्जवाटप अजूनही झालेले नाही. या पार्श्वभूमीवर बळीराजा आता उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, जनावरांचा चारा, यासाठी खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावत असल्याची वस्तुस्थिती आहे.

ठळक बाबी...

  • - १४२ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ६० टक्केसुद्धा पाऊस नाही.

  • - १ जून ते २८ ऑगस्टपर्यंत १९ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस.

  • - राज्यातील ३७६ महसूल मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड

  • - १५ ते २१ दिवसांचा खंड पडलेल्या महसूल मंडळांची संख्या ४८४

  • - प्रधानमंत्री पिकविमा योजनेत एक कोटी ७० लाख ४८ हजार शेतकरी; विमा संरक्षित रकमेची प्रतीक्षाच

१९ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, नांदगाव, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर (सासवड), हवेली (पुणे), सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर (विटा), अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यांमध्ये आतपर्यंत २५ ते ३० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही.

विभागनिहाय आत्महत्या (७ महिन्यातील स्थिती)

विभाग शेतकरी आत्महत्या

कोकण ०००

पुणे १६

नाशिक १७४

छ. संभाजीनगर ५८४

अमरावती ६३७

नागपूर १४४

एकूण १५५५

१५५५ पैकी ७७८ कुटुंबानाच मदत

राज्यात १ जानेवारी ३१ जुलैपर्यंत एक हजार ५५५ शेतकऱ्यांनी आपली जिवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांपैकी ७७८ जण मदतीसाठी पात्र ठरले आहेत. परंतु, ४६९ प्रकरणांची अद्याप चौकशी सुरु असून ३०८ प्रस्ताव मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. मदत न मिळालेले कुटुंबिय मदतीसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT