opration parivartan esakal
महाराष्ट्र बातम्या

एसपी तेजस्वी सातपुतेंचे ‘ऑपरेशन परिवर्तन’! लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतूक

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन परिवर्तन’ पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविले. त्यातून त्यांनी त्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन केले. १८ महिन्यात ६०४ जणांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोकसभेत केले.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री बंद झाल्यास गुन्हेगारी कमी होइल, असा विश्वास बाळगून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन परिवर्तन’ पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविले. त्यातून त्यांनी त्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन केले. १८ महिन्यात ६०४ जणांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोकसभेत केले.

मुळेगाव तांड्याची ओळख वर्षानुवर्षे हातभट्टी दारू निर्मितीचे गाव, अशीच होती. कायदा पायदळी तुडवून पिढ्यान्‌पिढ्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांचीही मुले शिकून मोठी होऊ शकतात, तेही अधिकारी बनू शकतात हा आत्मविश्वास पोलिस अधीक्षकांनी सुरवातीला त्या लोकांमध्ये निर्माण केला. पण, केवळ समुपदेशनाने काहीच होणार नाही, याची जाणीव ठेवून त्यांनी तो व्यवसाय मुळासकट बंद होण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने एक कृती आराखडा तयार केला आणि त्याला ‘आपरेशन परिवर्तन’ असे नाव दिले. हातभट्टी बनविणारी गावे व ती दारू विकली जाणाऱ्या गावांचा सर्व्हे झाला. त्यानंतर ६० गावांमध्ये तयार होणारी हातभट्टी दारु परिसरातील १२४ गावांमध्ये विक्री होते, हे लक्षात आले. त्यांनी प्रत्येक गाव आपल्या अधिकाऱ्यांना दत्तक दिले. आठवड्यातून तीनवेळा वेगवेगळ्या दिवशी त्याठिकाणी छापे टाकल्याने नफ्यापेक्षा तोटाच अधिक होऊ लागला. त्यावेळी त्या लोकांनी हा व्यवसाय बंद करून नवा व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली. त्यातून जवळपास सहाशे व्यक्तींनी तो अवैध व्यवसाय सोडला आहे.

  • ‘आपरेशन परिवर्तन’चे यश
    - सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२२ पर्यंत ५४९ केसेसमध्ये ६३३ जणांवर कारवाई
    - १८ महिन्यांत ८४.४४ लाखांचे रसायन तर ५.६७ लाखांची हातभट्टी दारु केली नष्ट
    - २०१९ च्या तुलनेत सध्या हातभट्टी बनविण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी झाले कमी
    - ६०४ पैकी ४४३ जणांनी पर्यायी व्यवसाय सुरु करून हातभट्टी दारुला ठोकला रामराम
    - ८५ जण शेती, १२६ जण मजुरी, १४२ जण पशुपालन, २१६ जणांनी कपडे विक्री, किराणा दुकान, ३५ जण खासगी कंपनीत काम करताहेत

  • चार मुद्द्यांवर सर्वाधिक फोकस
    १) छापे : हातभट्टी दारु बनविणारे अड्डे व विकणाऱ्यांवर सातत्याने टाकले छापे
    २) समुपदेशन : कायद्याने काय कारवाइ होऊ शकते, अवैध व्यवसायात कुटुंबाची वाताहात कशी होते, याची माहिती पटवून दिली
    ३) पुनर्वसन : अवैध व्यवसाय सोडणाऱ्यांना पर्यायी व्यवसाय रोजगार मिळावा म्हणून यशस्वी प्रयत्न, त्यांच्या मुलांसाठी नोकरी मेळावा
    ४) जागृती : हातभट्टी दारु पिणारे कमी झाल्यास हा व्यवसाय बंद होईल म्हणून पिणाऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना परावृत्त केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT