गणेशोत्सव म्हटला की, अनेकांना घरी जाण्याची ओढ लागलेली असते. कोणकणाचा गणेशोत्सव सर्वश्रुत आहे. त्यामुळे विशेषतः मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची गर्दी जास्त असते. त्यामुळे या रुटवरच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होते.
म्हणूनच खास गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने मुंबई-कुडाळ दरम्यान १८ अतिरीक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी २०२३ पासून १८ अनारक्षित अतिरीक्त गणपती विशेष गाड्या मुंबई-कुडाळ मार्गावर धावणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती उत्सवासाठी २०८ विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या. त्याचबरोबर गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० विशेष रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता या वर्षी एकूण २६६ गाड्या धावणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०११८५ विशेष १३ सप्टेंवर ते २ ऑक्टोबरपर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनीटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होऊन त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजता कुडाळ इथे पोहचेल.
ट्रेन क्रमांक ०११८६ स्पेशल १३ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबरपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी कुडाळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ३५ मिनीटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळून, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबेल.
त्याचबरोबर गणपती उत्सवासाठी लोकांची गर्दी कमी व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच स्पेशल ट्रेनसोबत विशेष भाडेही ठेवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने विशेषतः गणपती उत्सवासाठी ४० विशेष रेल्वे सेवा जाहिर केल्या आहेत. या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी दरम्यान धावतील.
ही गाडी १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान सावंतवाडीतून निघून १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. प्रत्येक दिशेने १५ सेवा चालवल्या जातील आणि गाड्यांना २४ डबे असतील.
वसई-पनवेल-रोहा असा या गाडीचा मार्ग असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे उधना ते मडगाव दरम्यान सहा साप्ताहिक गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.
१५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी उधना आणि १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी मडगावहून सुटणार आहे. प्रत्येक दिशेला तीन सेवा असलेल्या या गाडीला २२ डबे असतील आणि वसई-पनवेल-रोहा मार्गेही धावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.