Espalier School nashik esakal
महाराष्ट्र बातम्या

SPPU चा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून प्राध्यापक संजय ढोले पाटील यांच्या पुढाकाराने सावित्री फुले पुणे विद्यापीठाची (SPPU) फिरती विज्ञान प्रयोगशाळा इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे पोचली आहे.

हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांच्या आवडीचे

या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रा. निशांत जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना लिक्विड नाइट्रोजनचे (Liquid Nitrogen) विविध प्रयोग करून दाखविले. लिक्विड नायट्रोजनचा उत्कलनांक बिंदू उन्हे १९६ डिग्री सेल्सियस असतो व त्याचा परिणाम इतर सजीव निर्जीव वस्तूंवर कसा होतो याचे विविध प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच शास्त्राचे विविध प्रयोग नाटकाच्या माध्यमातून अतिशय हसत-खेळत त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या नाटकामध्ये पवनचक्की, सौर ऊर्जा, पॉली ऑल आणि आयसो साईनाईट या दोन रसायानांमधून पॉली युरोथीन फोम तयार करण्यात आला जो खुर्च्यांच्या सीट साठी वापरतात. इयत्ता आठवी व नववीसाठी खास प्लाझ्मा प्रयोग, (बायमेटालिक) द्वी धातू पट्टी प्रयोग घेतला. या कार्यक्रमाला इयत्ता पहिली ते नववी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एल. जी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने बनवलेल्या या फिरती प्रयोगशाळेमध्ये निशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविले तर नंदराज कोळेकर, प्रफुल्ल म्हसेकर यांनी विज्ञान नाटक सादर केले. सिताराम बहिर, हितेश सोनवणे यांनी सहाय्य केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंकिता कुर्या, विज्ञान शिक्षक आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT