gunratan sadavarte 
महाराष्ट्र बातम्या

ST Bank Sadavarte: सदावर्ते अडचणीत! पॅनेल प्रशासनानं एसटीच्या बँकेतून शेकडो कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप

सहकार आयुक्तांना एका सभासदानं पत्र लिहून तक्रार केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : एसटी सहकारी बँकेवर सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता आहे. पण आता या पॅनेलच्या आणि सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एकामागून एक चुकीचे निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात सहकार आयुक्तांना एका सभासदानं पत्र लिहून तक्रार केली आहे. (ST Bank Gunaratna Sadavarte in trouble allegation of withdrawing deposits of hundreds of crores by his Panel)

सहकार आयुक्तांना पत्र

एसटी कोऑपरेटिव्ह बँकेतून ११० कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात या सभासदांनी थेट सहकार आयुक्तांना पत्र लिहिलं असून या बँकेचं संपूर्ण संचालक मंडळचं बरखास्त करण्याची मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

बँकेची आर्थिक स्थिती बिघडली

गेल्या दोन ते तीन महिन्यांत या बँकेतून ११० कोटी रुपयांच्या ठेवी काढल्याचा सभासदांचा आरोप आहे. बँकेचा सध्याचा क्रेडिट डिपॉझिट रेशिया ८५ टक्क्यांहून अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, हे ठेवींचं प्रमाण साधारण ७२ टक्क्यांपर्यंत असणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा चांगली स्थिती बँकेची आहे. पण मोठ्या प्रमाणावर ठेवी काढण्यात आल्यानं बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याचा आरोपही सभासदांनी केला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

संचालकांचा राजीनामा

बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दीर्घ रजेनंतर राजीनामा दिला असून सध्या या पदावर कंत्राटी नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत यावर देखील सभासदांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळं सदावर्तेंच्या पॅनेलवर अनेक आरोप करण्यात आल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT