मुंबई : गेल्या 27 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपात (ST Bus Corporation strike) सहभागी झाल्यानंतर अजय गुजर (Ajay Gujar) यांनी पुकारलेल्या संपात एसटी कर्मचारी (ST bus employee) संपात सहभागी झाले होते. काहीच दिवसात राज्यभरातील 250 आगार बंद पडल्याने एसटीची सेवा अद्याप ठप्प आहे. मात्र, या संपातून आता अजय गुजर यांनी माघार घेऊन संप मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर आता संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांच्याकडून हा दुखवटा असून तशी नोटीस दिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, विविध नावाने हा संप भडकवण्याचा काम केलं जातं असल्यास योग्य नाही. कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या मंत्रालयाच्या दालनात सोमवारी दिवसभर संपकरी संघटना आणि परिवहन मंत्र्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. याच दरम्यान संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी चर्चेअंती संप मागे घेतला, मात्र त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला, अजय गुजर यांच्या विरुद्ध कर्मचार्यांनी प्रक्षोभक नारेबाजी करत, विलीनीकरणाशिवाय संप मागे घेणार नसल्याचेही वक्तव्य केले, दरम्यान संपकऱ्यांचे वकील सदावर्ते संपूर्ण वेळ हा संप नसून दुखवटा असल्याचे बोलत होते.
त्यामुळे आता एसटीच्या कामगार संघटना विरहित सुरू असलेला दुखवटा अधिक संपाचे फलित काय असा प्रश्न सार्वत्रिक उपस्थित केला जात आहे. शिवाय कारवाई होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि एसटीच्या आर्थिक नुकसानीला जबाबदारी कोणाची असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपकरी संघटनेचे वकील बदलण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपूर्ण संप काळात ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना आपला वकील म्हणून नियुक्त केले होते. मात्र, संपूर्ण संपकाळात अजय गुजर यांच्या ऐवजी ऍड.सदावर्ते यांनीच संपकरी कर्मचाऱ्यांना संबोधित केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अजय गुजर ऐवजी ऍड. सदावर्ते यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळेच संप मागे घेतल्यानंतरही दुखवट्याच्या नावाने संप सुरूच असल्याने अखेर अजय गुजर आता त्यांच्या संघटनेचे वकील बदलवण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची एकमेव महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेची संपाची नोटीस एसटी प्रशासन आणि राज्य सरकारला प्राप्त झाली होती. त्यानुसार आतापर्यंत संपकरी संघटनेला चर्चेला बोलावून सकारात्मक चर्चेअंती अजय गुजर यांनी संप मागे घेतला आहे. मात्र, आता विविध नावाने हा संप भडकवण्याचा काम केलं जातं असल्यास योग्य नाही. कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावे.
- अनिल परब, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.