एसटी बस Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील एसटी जागेवरच थांबली! 24 जिल्ह्यांतील बससेवा बंद

राज्यातील एसटी जागेवरच थांबली! 24 जिल्ह्यांतील बससेवा बंद

तात्या लांडगे

सर्व चालक, वाहकांनी आज कामबंद आंदोलन तीव्र केले असून राज्यातील महामंडळाच्या 250 पैकी 25 आगारातूनच बसेसवा सध्या सुरू आहे.

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा (Maharashtra State Transport Corporation) संचित तोटा वाढल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी आवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणे मुश्‍किल झाले आहे. कोरोनामुळे (Covid-19) महामंडळासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महामंडळ राज्य सरकारमध्ये (State Government) विलीन करावे, या मागणीवर कामगार संघटना ठाम आहेत. सर्व चालक, वाहकांनी आज कामबंद आंदोलन (St Bus Strike) तीव्र केले असून राज्यातील महामंडळाच्या 250 पैकी 25 आगारातूनच बसेसवा सध्या सुरू आहे.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंबई प्रदेशातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे येथील एसटी वाहतूक बंद असून मुंबई, पालघर, रत्नागिरी येथील वाहतूक कमी प्रमाणात सुरु आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील बससेवा थांबविण्यात आली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नगर, जळगाव, अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यातील एसटी गाड्या जागेवरच थांबविण्यात आल्या आहेत.

'या' जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात वाहतूक

सध्या मुंबई, पालघर, रत्नागिरी, भंडारा, कोल्हापूर, धुळे, नाशिक या सहा जिल्ह्यांमधील 25 आगारातून एक-दोन गाड्या प्रवाशांना घेऊन धावत आहेत. दुपारनंतर सध्या सुरु असलेली वाहतूक पूर्णपणे बंद होईल, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन केल्याशिवाय आम्ही कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर राज्य सरकारची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. एसटी कामगारांचे प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढून लालपरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, याचीही उत्सुकता आहे.

दिवाळीनिमित्त गावी आलेल्यांचे हाल

दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या महिला, तरुणींना सासरी जाण्यासाठी आता खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. आज आंदोलन तीव्र केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. त्यामुळे त्यांना त्रास सोसावा लागला. कामगारांच्या मागण्या मान्य होत नसल्याने कोरोना काळात 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही, राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने कामगार आता आक्रमक झाले असून एसटी वाहतूक आता पूर्ववत कधीपासून होणार, यावर कोणीही ठामपणे बोलू शकत नाही.

ठळक बाबी...

  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी

  • निर्णय होईपर्यंत कामबंद आंदोलनावर चालक-वाहक ठाम; राज्यातील 25 आगारातूनच बससेवा सुरु

  • महामंडळाच्या राज्यातील 225 आगारांपैकी 225 आगारातील एसटी वाहतूक बंद

  • प्रवाशांची गैरसोय; 27 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही राज्य सरकारकडून काहीच निर्णय नाही

  • औरंगाबाद, अमरावती विभागातील बससेवा पूर्णपणे बंद; नागपूर, नशिक विभागातील पाच आगारातूनच बससेवा

  • मुंबई प्रदेशीाल 12 तर पुणे प्रदेशातील आठ आगारातून सुरू आहे बससेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT