ST Mahamandal Sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Mahamandal : रोजंदारीवरील एसटी कामगारांना दिलेला भत्ता वसुलीचे काम एसटी महामंडळ प्रशासनाने केले सुरू

कोरोना काळात असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रोजंदारीवरील एसटी कामगारांना भत्ता देण्यात येत होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोना काळात असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रोजंदारीवरील एसटी कामगारांना भत्ता देण्यात येत होता. तेव्हा दिलेला हा भत्ता वसुली करण्याचे काम एसटी महामंडळ प्रशासनाने सुरू केले आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांच्या पगारातून हप्त्याने हे पैसे वसूल केले जात असल्याने कामगार वर्गातून हे तुघलकी फर्मान मागे घ्यावे, अशी मागणी होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कामगारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प होते, पण नगरपालिका, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सरकारने फक्त एसटी सेवा सुरू ठेवली होती. यामध्ये मुंबई परिसरात एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होती, तर ग्रामीण भागात ही सेवा कमी होती.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलाविण्यात येत होते. ज्या दिवशी कर्मचारी कामावर उपस्थित नसतील त्या दिवसाची हजेरी ग्राह्य धरून त्यांना आदेशाप्रमाणे वेतन दिले गेले. मात्र एसटीच्या सातारा विभागाने आता कर्मचाऱ्यांना दिलेल्या ६९ लाख रुपयांच्या वेतन रकमेची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना काळातील परिपत्रक

कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने ज्या कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सरकारच्या आदेशाने ३१ मार्च २०२० रोजी परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांची हजेरी ग्राह्य धरून त्यांना वेतन देण्यात आले होते.

कोरोना काळात राज्यभरातील अंदाजे पाच हजारांपेक्षा जास्त रोजंदार एसटी कर्मचारी दिवसा-आड कामावर हजर होते. मात्र उपस्थित नसतील त्या दिवसांचे वेतन त्यांना देण्यात आले नाही. अशा कर्मचाऱ्यांना ते वेतन देण्यात यावे व वसुलीचे तुघलकी फर्मान काढले आहे ते मागे घ्यावे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT