ST Workers esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; 'हा' तोडगा निघण्याची शक्यता

Mumbai Central ST Stand: ''प्रत्येक वेळी आमची फसवणूक केली जाते, हे कर्मचाऱ्यांना माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मुलंबाळं नाहीत का? मी प्रवाशांची माफी मागतो, तुमचे हाल होत आहेत. पण तुम्ही थोडं आमची बाजू बघा, आम्हाला कोण बघणार? मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही का रस्त्यावर उतरलो असतो?'' अशी प्रतिक्रिया संघटनेचे संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.

संतोष कानडे

CM Eknath Shinde: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. हा संप होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगार संघटनेची बैठक होणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याची माहिती आहे. मंगळवारी किंवा बुधवारी ही बैठक होऊ शकते. दुसरीकडे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाच्या गेटजवळ सगळे कर्मचारी आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलनाबाबत भूमिका घेत नाहीत तोवर इथेच बसून राहणार असल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.

दरम्यान, बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होऊ शकते किंवा भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं, अशी माहिती आहे.

कर्मचारी काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची बैठक ठरलेली होती ती झाली नाही. आम्ही अल्टिमेटम देऊनही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आज प्रवाशांचे जे हाल होत आहेत, त्याला केवळ सरकार जबाबदार आहे. प्रवाशांच्या घरी जसा सण असतो तसाच आमच्या घरीदेखील आहे. मात्र आम्हाला मिळणाऱ्या वेतनात तो सण आम्हाला करता येत नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे वेतनवाढीची मागणी आहे.

प्रत्येकवेळी आमची फसवणूक- संदीप शिंदे

''प्रत्येक वेळी आमची फसवणूक केली जाते, हे कर्मचाऱ्यांना माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मुलंबाळं नाहीत का? मी प्रवाशांची माफी मागतो, तुमचे हाल होत आहेत. पण तुम्ही थोडं आमची बाजू बघा, आम्हाला कोण बघणार? मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही का रस्त्यावर उतरलो असतो?'' अशी प्रतिक्रिया संघटनेचे संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT