महाराष्ट्र बातम्या

'आम्ही भडकवायला कर्मचारी मूर्ख नाहीत'; भाजपचा संपाला पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

दोन चार नेते भाषण करून भडकवण्याच काम करत आहेत. त्यांच्या भूलथापांना कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये असंही अनिल परब म्हणाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला भाजपने पाठिंबा दिला असून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे रस्त्यावर उतरले आहेत. तसंच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेसुद्धा सदाभाऊ खोत यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. एसटीचे विलिनिकरण सरकारमध्ये करावे अशी प्रमुख मागणी मान्य करा तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर या, न्यायालयाने संप बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे असे म्हटले. तर राजकीय पक्षांकडून पोळी भाजली जात आहे. दोन चार नेते भाषण करून भडकवण्याच काम करत आहेत. त्यांच्या भूलथापांना कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये असंही अनिल परब म्हणाले होते.

नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये या अनिल परब यांच्या वक्तव्याचा प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला. सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथं अडवण्यात आले. पोलिस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याना सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला. तसंच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. त्याठिकाणीच ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. मानखुर्द चेक पोस्ट येथे पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांच्या गाड्या आढवल्या जाणारा नाहीत असे आश्वासन दिल्या नंतर सकाळी ८ वाजलेपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन संपवून विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह सदाभाऊ खोत आझाद मैदानाकडे रवाना झाले.

दरेकर म्हणाले की, आम्ही भडकवले तरी कर्मचारी मूर्ख नाहीत, त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी काय करावं नीट समजतंय. त्यामुळे हे कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. त्यांचा संघटनांवर पण विश्वास नाही राहिला. त्यामुळे आम्ही भडकवायचा प्रश्नच येत नाही. कोणाचा सपोर्ट नाही आणि आम्ही सपोर्ट करतोय तर ते पाप करतोय का असा सवालसुद्धा दरेकर यांनी विचारला.

सरकारला प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसणार असेल तर दुर्दैव आहे. मग त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. 2-4 नेते नव्हे तर भारतीय जनता पार्टी पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीचे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन आहे. तुम्हाला जर भीती वाटत असेल आणि समर्थन करू नये, आमच्या आमदार-खासदारांनी जाऊ नये असे वाटत असेल तर निर्णय घ्या. आम्ही तुमचे अभिनंदन करतो, तुमचे आभार मानू आणि सगळे श्रेय तुम्हाला देऊ असेही दरेकर यांनी म्हटले. आता आम्हाला चर्चा नको. या कर्मचाऱ्यांची एवढीच मागणी आहे. आता फक्त विलीनीकरणाचा काय करताय ते बोला असेही दरेकर म्हणाले.

आंदोलन चिघळवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे. आझाद मैदानात शांततेनं कामगार येतील असं सांगितलं होतं. पण तरीही कामगारांना अडवण्यात आलं आहे. जवळपास ५० हजार कामगार रस्त्यावर उतरले आहेत. राज्याचे धुरंधर नेते शरद पवार, अनिल परब आणि गृहमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यात आंदोलन मोडून काढण्याचा निर्णय़ झाला. तुम्ही ड्रग्ज प्रकरणी बैठक घेताय पण तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे मी अन्नत्याग आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT