महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकींवर निवडणुक आयोगाची करडी नजर, दर दोन तासाला पाठवला जाणार अहवाल

जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. प्रत्येक दोन तासाला झालेल्या मतदानाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

State Election Commission: जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. प्रत्येक दोन तासाला झालेल्या मतदानाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायती व काही रिक्त झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

आधार कार्ड, निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शासकीय सेवेतील असल्यास ओळखपत्र, पासपोर्ट, शासकीय योजनेच्या लाभासाठी फोटो ओळखपत्र या पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदाराला आपली ओळख सिद्ध करता येणार आहे.

प्रत्येक तहसील कार्यालयात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून त्यामार्फत तालुक्यातील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्य निवडणूक आयोगाला दर दोन तासांना पाठविली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

SCROLL FOR NEXT