loan esakal
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय; 'ना नफा, ना तोटा'वर देणार कर्ज

स्नेहल कदम

अतिवृष्टी, पूरामुळे अनेक जिल्ह्यातील बाधितांचे मोठे नुकसान झाले आहे. यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. (maharashtra News) पूरग्रस्त भागातील बाधितांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मात्र पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी (KDCC bank) पुढाकार घेत ना नफा, ना तोटा तत्वावर कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या बैठकीत झाला. यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना याचा फायदा होणार असून केवळ ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. (flood people)

अतिवृष्टी, पूरामुळे अनेक जिल्ह्यातील बाधितांचे मोठे नुकसान झाले आहे. यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र या आपत्तीतून बाधितांना सावरण्यासाठी जिल्हा सहकारी बँकांनी एक पाऊल उचलले आहे. भांडवल उभारणी खर्चापेक्षा (कॉस्ट ऑफ फंड) थोड्या अधिक व्याज दराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT