Maharashtra Government  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Government : आर्थिक गुंतवणुकीची खबरदारी अन् सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

Sandip Kapde

मुंबई: गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनी बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दाणी वखरे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनी बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.

यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजिटल सिस्टीम सुरक्षितता आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रामराजे निंबाळकर महायुतीचा प्रचार का करत नाहीत? अजितदादा माजी सभापतींना धाडणार नोटीस

WI vs ENG 3rd ODI: ड्रामाच ड्रामा! Mumbai Indians चा गोलंदाज कॅप्टनवर भडकला, विकेट घेतली अन् रागाने मैदान सोडले Video

Share Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; निफ्टी 24,400च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

अमेरिका निवडणुकीत Donald Trump यांचा विजय, झेलेन्स्कींना टेन्शन! अडचणी वाढणार? नेमकं प्रकरण काय?

'अशोक मा. मा.' आणि 'पिंगा गं पोरी'ची वेळ ठरली! या तारखेपासून येणार भेटीला; कलर्सच्या कोणत्या मालिका घेणार निरोप?

SCROLL FOR NEXT