State Level Kho-kho Campionship:पुण्याच्या दोन्ही संघांनी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता पुरुष विभागात त्यांच्यासमोर मुंबई उपनगरचे, तर महिला विभागात ठाण्याचे आव्हान असणार आहे. परभणी येथे ही स्पर्धा सुरु आहे.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सुरेश जाधव क्रीडानगरीत सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला विभागातील चुरशीच्या उपांत्य सामन्यात धाराशिवला ठाण्याकडून ११-१२ असा एका गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. मध्यंतराची ५-४ ही एक गुणाची आघाडीच ठाण्याला विजय मिळवून देऊन गेली. रूपाली बडे (२.४०, १.२० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (२.२५ व १ मि. संरक्षण) यांची संरक्षणाची खेळी, तर शीतल भोर (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) हिची अष्टपैलू खेळी ठाण्याच्या विजयात उल्लेखनीय ठरली. धाराशिवच्या सुहानी धोत्रे हिने आक्रमणात चार गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिची (३.३०, २ मिनिटे संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपुरी पडली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रियांका इंगळे (२ मिनिटे संरक्षण व ५ गुण) व श्वेता वाघ (२.४० व १.२० मि. नाबाद संरक्षण व २ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे गतविजेत्या पुण्याने रत्नागिरीवर १७-९ असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. रत्नागिरीच्या पायल पवार (१.३० मि. संरक्षण २ गुण ) हिच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
गतविजेत्यांची आगेकूच
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने सांगलीवर २०-१२ अशी मात केली. हर्षद हातणकर (१.१०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण) व अक्षय भांगरे (१, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांची अष्टपैलू खेळी संघास विजय मिळवून दिली. सांगलीकडून अभिषेक केरीपाळे (दोन्ही डावात दीड मिनिटे संरक्षण) व सुरज लांडे (३ गुण ) यांनी विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.(Latest Marathi News)
चुरशीच्या लढतीत यश
पुरुष विभागात पुणे व ठाणे ही लढत मध्यंतरापर्यंत अत्यंत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यंत १०-९ अशी निसटती आघाडी असलेल्या पुण्याने १६-१४ असा २.५० मिनिटे राखून विजय साकारला. पुण्याच्या विजयात प्रतीक वाईकर (१.१० मि. संरक्षण ४ गुण), श्रेयश गरगटे (१ मि. संरक्षण व ३ गुण) व ऋषभ वाघ (१ व २ मि. संरक्षण) यांनी मोलाचा वाटा उचलला.
ठाण्याच्या आकाश कदम यांनी आपल्या धारदार आक्रमणात पाच गडी टिपले. गजानन शेंगळ व सुरज झोरे यांनी प्रत्येकी दीड मिनिटे संरक्षण केले. निखिल वाघ व संकेत कदम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.