chori sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरातील १४ महिन्यांतील स्थिती! दररोज एका वाहनाची चोरी; २ दिवसांतून १ घरफोडी अन्‌ महिन्यात सरासरी ३ जबरी चोऱ्यांचीही नोंद

शहराचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, परंतु ना पोलिस ठाण्यांची ना मनुष्यबळात वाढ झाली. १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या १४ महिन्यांत शहरातून दररोज एका वाहनाची चोरी झाली तर दोन दिवसांतून एक घरफोडी आणि महिन्यातून तीन जबरी चोरी झाल्या आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, परंतु ना पोलिस ठाण्यांची ना मनुष्यबळात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या १४ महिन्यांत शहरातून दररोज एका वाहनाची चोरी झाली तर दोन दिवसांतून एक घरफोडी आणि महिन्यातून तीन जबरी चोरी झाल्या आहेत. पण, त्यापैकी अनेक गुन्ह्यांतील आरोपींचा तपास अद्याप सुरुच आहे.

चोरट्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या दुचाकी असो की तेथील दुकाने, शहरातील घरासमोरील वाहने देखील चोरली आहेत. घर बंद दिसले की त्याठिकाणी चोरी होतेच अशी भीती अनेकांच्या मनात आहे. हॅण्डल लॉक करा न करा, चोरटे अलगदपणे दुचाकी चोरून नेत आहेत. कधी एटीएममध्ये जाऊन कार्डची अदलाबदल करून पैसे लंपास केले जातात तर कधी ऑनलाइन फसवणूक देखील होत आहे. पोलिस ठाण्यांमधील गुन्हे प्रकटीकरण पथक, गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला, पण रात्रगस्त, दिवसाची गस्त कमी पडत असल्याचे अनेकजण सांगतात. पण, त्या नागरिकांनी देखील स्वत:च्या घरासमोर सीसीटीव्ही लावणे, परगावी किंवा बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगणे जरुरी आहे हे नक्की.

‘या’ गुन्ह्यातील तपासाकडे लक्ष, पण...

होम मैदान परिसरातील कारचालकाच्या हातातील अंगठी जबरदस्तीने चोरून नेलेला भोंदुबाबा, श्री सिद्धेश्वर यात्रेत हरवलेली चिमुकली, विजापूर नाका हद्दीतील एका स्क्रॅप दुकानदाराला दोन लाखाला फसविणारा परराज्यातील तरुण अशा काही महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. अनेकदा गुन्हा दाखल झाल्यावर तपास अधिकारी म्हणून ज्यांचे नाव असते त्यांना देखील त्यासंदर्भात माहिती नसते हे विशेष. नूतन पोलिस आयुक्तांकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत.

शहरातील चोरीची स्थिती (जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४)

  • वाहन चोरी

  • ४३६

  • घरफोडी

  • १६०

  • जबरी चोरी

  • ४०

  • चोरी, घरफोडीचे एकूण गुन्हे

  • ६३६

सव्वादोनशे वाहनांचा तपास लागेना

सोलापुरात सदर बझार, फौजदार चावडी, एमआयडीसी, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती, जोडभावी पेठ अशी सात पोलिस ठाणी आहेत. त्याअंतर्गत जवळपास सतराशे कर्मचारी कार्यरत असून त्यांचा सर्वाधिक वेळ हा सण-उत्सव, पुण्यतिथी, जयंतीचा बंदोबस्तातच जातो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडील गुन्ह्यांच्या तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही अशीही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या काळातील १२ जबरी चोरी, ६० घरफोडी व जवळपास २२८ वाहन चोरीचा तपास अजून लागलेला नाही.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी, संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवावे

प्रत्येकाने घरासमोर सीसीटीव्ही लावणे, बाहेर जाताना शेजारच्यांना सांगणे, घरात मौल्यवान वस्तू न ठेवणे, संशयास्पद व्यक्ती एखाद्या परिसरात फिरत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे असे उपाय केल्यास निश्चितपणे घरफोडी, चोरीचे प्रमाण कमी होईल.

- विजय कबाडे, उपायुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT