रिक्षा solapur news esakal
महाराष्ट्र बातम्या

दिसला प्रवासी की थांबव रिक्षा! सोलापूर शहरात कागदावर 13,000 रिक्षा अन्‌ रस्त्यांवर धावतात 25,000 रिक्षा; रिक्षा वाढल्या तरी शहरात थांबे तेवढेच

वाहतुकीला अडथळा व कोणताही अपघात होणार नाही, अशा चौकांमध्ये रस्त्यांलगत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे थांबे असतात. सात-आठ वर्षांपूर्वी शहरातील रिक्षांसाठी २२७ थांबे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यानंतर रिक्षांची संख्या भरमसाट वाढली, पण थांबे तेवढेच राहिले.

तात्या लांडगे

सोलापूर : वाहतुकीला अडथळा व कोणताही अपघात होणार नाही, अशा चौकांमध्ये रस्त्यांलगत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे थांबे असतात. सात-आठ वर्षांपूर्वी शहरातील रिक्षांसाठी २२७ थांबे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यानंतर रिक्षांची संख्या भरमसाट वाढली, पण थांबे तेवढेच राहिले. रिक्षाचालकांमध्येच सध्या स्पर्धा सुरू असून अनेकजण थांब्यांवर थांबतच नाहीत. वाटेत प्रवासी दिसेल तेथे थांबून त्यांची वाहतूक करतात. त्यामुळे किरकोळ अपघात वाढले असून वाहतूक कोंडीसाठी देखील हा बेशिस्तपणा कारणीभूत ठरू लागला आहे.

सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांचे परमीट खुले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात दरवर्षी साधारणत: ६०० ते ११५० रिक्षात वाढ होत आहे. दुसरीकडे महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आल्याची स्थिती आहे. सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सध्या १३ हजार ऑटोरिक्षा आहेत, ज्यातून प्रवासी वाहतूक केली जाते. महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आली असून एसटी बसगाड्या शहरातील सर्वच नगरांमधील रस्त्यांवरून धावू शकत नाहीत. त्यामुळे शहरात दरमहा ६५ ते ८० ऑटोरिक्षा वाढत आहेत.

थांबे पूर्वीचेच, प्रवासी तेवढेच मात्र रिक्षांची भरमसाट वाढ झाली, यामुळे अनेकजण थांब्यांवर थांबतच नाहीत. त्यांच्यातील स्पर्धेमुळे अनेकदा रिक्षाचालक मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेताच प्रवासी दिसेल तेथे अचानक थांबतात. त्यातून अनेकदा अपघात झाले असून बऱ्याच अपघातात काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. दुसरीकडे मोहोळ ते सोलापूरचा प्रवास अवघ्या ४० मिनिटात होतो, पण शहरातून आसरा चौक किंवा अन्य कोणत्याही टोकाला पोचायला २० ते २५ मिनिटे लागतात अशीही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी बेशिस्त रिक्षा हे प्रमुख कारण मानले जाते.

आरटीओच्या नोंदीनुसार १३००० रिक्षा, पण...

आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात १३ हजारांपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आहेत. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षांची संख्या २५ हजारांहून अधिक असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनीच केला आहे. अनफिट, स्क्रॅप रिक्षा देखील प्रवासी वाहतूक करताना रस्त्यांवर दिसत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. १० हजारांहून अधिक अनफिट रिक्षा रस्त्यांवर धावत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील रिक्षांचे थांबे वाढवावेत

शहरात रिक्षांची संख्या प्रचंड झाली असतानाही प्रवासी थांबे मात्र तेवढेच आहेत. आता थांबे वाढवावेत, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि स्क्रॅप, भंगार रिक्षांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या आमच्या आहेत.

- अमोल डुरके, सचिव, बसवसेना रिक्षाचालक संघटना, सोलापूर शहर

सप्टेंबरअखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यतेखाली बैठक

शहरातील बेशिस्त रिक्षांवर प्राधान्याने कारवाई केली जात आहे. सोलापूर शहरात वाढलेल्या रिक्षांसाठी वाढीव थांब्यांसाठी आमचा महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासंदर्भात सप्टेंबरअखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यतेखाली बैठक होणार आहे.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

शहरातील रिक्षांची सद्य:स्थिती

  • रेकॉर्डनुसार एकूण रिक्षा

  • १३,०००

  • रस्त्यांवर धावणाऱ्या अंदाजे रिक्षा

  • २५,०००

  • एकूण प्रवासी थांबे

  • २२७

  • वाढीव थांब्यांची मागणी

  • २८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT