रेड झोनमध्ये 13 जिल्हे! शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता Sakal
महाराष्ट्र बातम्या

रेड झोनमध्ये 13 जिल्हे! शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता

रेड झोनमध्ये 13 जिल्हे! शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता; आठ दिवसांत सक्रिय रुग्ण दुप्पट

तात्या लांडगे

सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच 29 डिसेंबर रोजी सर्वाधिक तीन हजार 900 रुग्णांची नोंद झाली.

सोलापूर : राज्यातील Covid-19 ची दुसरी लाट ओसरल्यानंतर सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच 29 डिसेंबर रोजी सर्वाधिक तीन हजार 900 रुग्णांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे, 29 डिसेंबरला राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) सर्वाधिक 85 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), नगर (Nagar), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहून निर्बंध कडक होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. (Strict restrictions will be imposed in thirteen districts with high corona patients)

.

राज्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा विळखा घट्ट होत असून कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले आहेत. तरीही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरीकडे, रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी असतानाही रस्त्यावर सर्रास गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील नऊ कोटी 14 लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. तरीही, अद्याप एक कोटी व्यक्‍तींनी लसीचा एकही डोस घेतला नसून दुसरा डोस घेण्याचा कालावधी संपूनही जवळपास 82 लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून गावोगावी लसीकरण मोहीम आयोजित करूनही आणि दोन्ही डोस न घेतलेल्यांवरील निर्बंध कडक करूनही लसीकरण 100 टक्‍के झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार सुरवातीला सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे

जिल्हानिहाय सक्रिय रुग्ण

मुंबई (8060), ठाणे (1638), पालघर (298), रायगड (317), पुणे (2053), सातारा (180), सांगली (90), कोल्हापूर (60), सोलापूर (89), नाशिक (412), नगर (385), औरंगाबाद (54), नागपूर (137), रत्नागिरी (44), सिंधुदुर्ग (12), जळगाव (9), नंदुरबार (4), धुळे (2), जालना (16), बीड (39), लातूर (33), परभणी (19), हिंगोली (1), नांदेड (20), अमरावती (8), अकोला (24), वाशिम (1), बुलढाणा (10), यवतमाळ (7), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (8), चंद्रपूर (6) आणि गडचिरोली (7).

ठळक बाबी...

  • 21 डिसेंबरनंतर राज्यात वाढले सात हजार सक्रिय रुग्ण; विद्यापीठाची परीक्षा होणार ऑनलाइन

  • राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण; शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता

  • रेड झोनमध्ये (Red Zone) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर

  • चार महिन्यांनंतर 29 डिसेंबर रोजी राज्यात आढळले सर्वाधिक 3900 रुग्ण

  • राज्यात ओमिक्रॉनचा विळखा घट्ट; 29 डिसेंबरला आढळले 85 रुग्ण; 252 पैकी 99 रुग्ण झाले बरे

  • आतापर्यंत राज्यातील 66 लाख 65 हजार 386 जणांना होऊन गेला कोरोना

  • सद्य:स्थितीत राज्यात कोरोनाचे 14 हजार 65 ऍक्‍टिव्ह रुग्ण

  • राज्यातील एक लाख 41 हजार 496 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT