महाराष्ट्र बातम्या

पावसाची जूनमध्ये दमदार हजेरी; राज्यात सरासरीच्या ३१ टक्के अधिक पाऊस

राज्यात सरासरीच्या ३१ टक्के अधिक पाऊस; साताऱ्यात सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मॉन्सूनने वेळेत दाखल झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. विदर्भात काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती होती. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या २०७.६ मिलिमीटरपैकी २७२.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८३ टक्के अधिक, तर अकोला जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे उणे ५१ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जूनमध्ये ९२ ते १०८ टक्के वर्तवली होती शक्यता :

हवामान विभागाने पहिल्या टप्यात जाहीर अंदाजामध्ये ९८ टक्के, तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या अंदाजामध्ये १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा प्रथमच जून महिन्याचा अंदाज जाहीर केला होता. त्यामध्ये जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली होती. महाराष्ट्राचा विचार करता यंदाच्या जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविली होती.

कोकणात सर्वाधिक पाऊस

कोकणात दरवर्षीप्रमाणेच चालू वर्षी या भागात जोरदार पाऊस पडला आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणसह, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. १४ जून रोजी रत्नागिरी येथे २४३.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतरही पाऊस पडत राहिल्यानंतर २० जूनपासून कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर काहीशी उघडीप दिल्याने कोकणात सरासरीच्या ६८९.७ मिलिमीटरपैकी ९७३.६ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के अधिक पाऊस पडला. यामध्ये पालघर रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडला. मुंबईत सरासरीच्या ५४०.९ मिलिमीटरपैकी ६९४.८ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत २८ टक्के अधिक पाऊस पडला. रायगड, रत्नागिरीमध्ये ५० टक्के अधिक पाऊस पडला असून सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी म्हणजेच २५ टक्के अधिक पाऊस पडला.

दक्षिणमध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी

यंदा मॉन्सून दाखल झाल्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक होता. साधारणपणे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला. तर १९ जून रोजी कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यानंतर पुणे, सांगली जिल्ह्यांत काहीसा कमी जोर होता. सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव या भागांत कमी पाऊस पडला असून धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाने चांगलीच ओढ दिली होती. सातारा जिल्ह्यात सरासरीच्या १९४.१ मिलिमीटरपैकी ३५५.७ मिलिमीटर म्हणजेच ८३ टक्के अधिक पाऊस पडला. धुळे जिल्ह्यात सरासरीच्या १२१.५ मिलिमीटरपैकी अवघे ७५.२ मिलिमीटर म्हणजेच उणे ३८ टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे नद्यांच्या पाणीप्रवाहात वाढ झाल्याची स्थिती आहे.

मराठवाड्याला पावसाचा दिलासा

दुष्काळी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी पुरेसा पाऊस झाला. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी जूनअखेरीस काहीशी ओढ दिली होती. परभणी, जालना, औरंगाबाद या तीन जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या १३८.० मिलिमीटरपैकी १८०.१ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. परभणीमध्ये सरासरीच्या १४५.३ मिलिमीटरपैकी २४९.७ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या ७२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पडला. तर लातूरमध्ये सरासरीच्या तुलनेत उणे ९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

विदर्भात पावसाची हुलकावणीच :

विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने जूनमध्ये हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जूनमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अकोला, गोंदिया, बुलडाणा या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. विदर्भात सरासरीच्या १७०.६ मिलिमीटरपैकी २०३.६ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस पडला. यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीहून अधिक पाऊस पडला. तर भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत १८९.३ मिलीमीटरपैकी २६८.८ मिलिमीटर म्हणजेच ४२ टक्के अधिक पाऊस पडला.

एक जून ते ३० जूनअखेर जिल्हानिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः स्त्रोत - हवामान विभाग

विभाग -- सरासरी पाऊस -- प्रत्यक्ष पडलेला पाऊस -- पावसाची तफावत, टक्केवारीमध्ये

मुंबई शहर -- ५४०.९ -- ६९४.८ -- २८

पालघर --- ४११.९ -- ५८५.२-- ४२

रायगड --- ६५५.८ -- ९८५.७ -- ५०

रत्नागिरी -- ८१३.५ -- १२२३.६ --५०

सिंधुदुर्ग -- ८८०.१ --१०९७.९-- २५

ठाणे -- ४६१.९ --- ७३१.० -- ५८

नगर -- १०८.२ -- १२३.७ -- १४

धुळे -- १२१.५ -- ७५.२ -- उणे ३८

जळगाव -- १२३.७ -- १२७.१ -- ३

कोल्हापूर -- ३६२.९ -- ६२६.६ -- ७३

नंदुरबार -- १५५.९ -- १०९.७ -- उणे ३०

नाशिक --- १७४.४ -- १६३.२ -- उणे ६

पुणे --- १७६.२ -- २६१.८ -- ४९

सांगली -- १२९.० --- १७५.७ -- ३६

सातारा -- १९४.१-- ३५५.७ -- ८३

सोलापूर --- १०२.५ -- ११८.०-- १५

औरंगाबाद -- १२५.२ -- १६८.७ --- ३५

बीड -- १२८.४-- १६६.१ -- २९

हिंगोली -- १६९.२ -- १९०.८ -- १३

जालना -- १३२.६ -- २१६.६ -- ६३

लातूर -- १३५.४ -- १४७.३ -- ९

नांदेड -- १५५.४ -- १८०.५ -- १६

उस्मानाबाद -- १२६.९ -- १४३.७ -- १३

परभणी -- १४५.३-- २४९.७ -- ७२

अकोला -- १३६.९ -- ६७.० -- उणे ५१

अमरावती -- १४५.७ -- १८२.३ -- २५

भंडारा -- १८९.३ -- २६८.८ -- ४२

बुलडाणा -- १३९.३ -- १३५.५ -- उणे ३

चंद्रपूर -- १८३.५ -- २५१.३ -- ३७

गडचिरोली -- २१०.९ -- २१५.२ -- २

गोंदिया -- १९२.८ -- १९१.० -- उणे १

नागपूर --१६६.३ -- २२३.४ -- ३४

वर्धा -- १७४.१ -- २२९.७-- ३२

वाशीम -- १६६.४ --- २१९.९ -- ३२

यवतमाळ -- १६३.९ -- २२६.५ -- ३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT