PM Modi sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur: पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची स्थिती; 7 महिन्यानंतरही लाभार्थी भाड्याच्याच घरात

PM Modi : आशिया खंडातील सर्वात मोठ्या 30,000 घरांच्या रे नगर (सोलापूर) गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15024 घरांचे लोकार्पण 19जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. मात्र, 7 महिने पूर्ण झाल्यानंतरही त्याठिकाणी अद्याप एकही लाभार्थी रहायला गेलेला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या ३० हजार घरांच्या रे नगर (सोलापूर) गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. मात्र, सात महिने पूर्ण झाल्यानंतरही त्याठिकाणी अद्याप एकही लाभार्थी रहायला गेलेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे. लाभार्थींना दोन लाख रुपयांची वाढीव सबसिडी अपेक्षित असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रे नगर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा मोठा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. त्याठिकाणी उर्दू, मराठी माध्यमाच्या शाळा, अंगणवाडी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन अशा सर्व सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, अजूनही प्रकल्पाच्या ठिकाणी जायला मुख्य रस्ता झालेला नाही. त्याठिकाणी रोजगार, भाजीपाला मार्केट, सुरक्षिततेसाठी पोलिस ठाणे, वाहतूक, अशा मुख्य सुविधा नाहीत. त्यामुळे हातावरील पोट असलेल्या लाभार्थींना सध्याच्या ठिकाणाहून रे नगरच्या गृहप्रकल्पात जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत. सध्याच्या ठिकाणी चार हजार रुपये भाडे असलेल्यांना रे नगरात गेल्यावर रोजगारासह सर्वच बाबींसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे रहायला जाण्यापूर्वी लाभार्थी मुलांचे शिक्षण, स्वत:चा रोजगार, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा बाबींची घडी बसवत आहेत.

पुढील टप्प्याचे काम सुरू, लाभार्थींना रहायला येण्यास सांगितले

रे नगर गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यात १५ हजार २४ घरे बांधून पूर्ण झाली असून त्याचे लोकार्पणही झाले आहे. पण, अजून लाभार्थी याठिकाणी रहायला आलेले नाहीत. आता दुसऱ्या टप्प्यातील १५ हजार घरांचे बांधकाम सुरू असून पुढच्यावर्षी हे काम पूर्ण होईल.

- मिलिंद आटकळे, उपअभियंता, म्हाडा

लाभार्थींना द्यावी अजून दोन लाखांची सबसिडी

केंद्र शासनाने हातावरील पोट असलेल्या लाभार्थींना ३० हजार घरे दिली, पण त्यांना अडीच लाख रुपयांची सबसिडी दिली असून त्यांना आणखी दोन लाखांची सबसिडी मिळावी अशी आमची मागणी आहे. जेणेकरून त्यांना बॅंकांचे हप्ते व त्यावरील व्याज भरावे लागणार नाही.

- नलिनी कलबुर्गी, चेअरमन, रे नगर फेडरेशन, सोलापूर

रे नगर प्रकल्पाची स्थिती

  • एकूण घरे

  • ३०,०००

  • प्रकल्पाची रक्कम

  • १,८११ कोटी

  • पहिल्या टप्प्यात घरे पूर्ण

  • १५,०२४

  • दुसऱ्या टप्प्यात कामे सुरू

  • १४,९७६

  • रहायला गेलेले लाभार्थी

  • ०००

शाळा लाभार्थींच्या इमारतीतच भरणार

जिल्हा परिषदेने रे नगर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी सहा शाळा (तीन उर्दू, तीन मराठी माध्यमाच्या) सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. त्यांच्याकडून त्याला मंजुरी मिळाली आहे. पण, लाभार्थी रहायला आल्यास त्यांच्या मुलांसाठी तुर्तास गृह प्रकल्पातील एका इमारतीतच शाळा भरविण्याचे नियोजन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

अजूनही ८ ते १० हजार लाभार्थींनी चाव्याच नाहीत

‘म्हाडा’च्या माध्यमातून रे नगर गृहप्रकल्प उभारला जात आहे. त्याठिकाणी पात्र लाभार्थीला साडेचार लाख रुपयाला घरकुल मिळणार आहे. त्यात अडीच लाख रुपयांची केंद्र सरकारची सबसिडी असून ५० हजार रुपये लाभार्थीला रोख स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तर दोन लाख रुपयांचे बॅंक कर्ज मंजूर करण्यात आले आहे. आता अनेकांचे बॅंकांचे हप्ते व व्याज सुरू झाले, पण त्यांना ५० हजार रुपये रोखीने भरता आले नसल्याने चाव्या देखील मिळालेल्या नाहीत. अशा लाभार्थींची संख्या अंदाजे ८ ते १० हजारांपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT