representative image 
महाराष्ट्र बातम्या

Crime News : धक्कादायक! पोलिसांचा खबरी समजून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोलीत धक्कादायक घटना घडली आहे. गावापासून दूर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला नक्षलवाद्यांनी ठार केले. हा तरुण गावाला होळीचा सण साजरा करायला आला होता. मात्र हा सण त्या तरूणाच्या आयुष्यातील शेवटचा सन ठरला. स्पर्धा परीक्षा पास करून अधिकारी  होण्याचे त्या तरूणाचे स्वप्न होते. तरुणासोबत त्याचे स्वप्न देखील नक्षलवाद्यांनी नष्ट केले. 

नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साईनाथ नरोटे (वय २६) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

मृत साईनाथ नरोटे भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Crime News)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता, होळीच्या सणानिमित्त तो आपल्या स्वगावी आला होता. मात्र पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याचा खून केला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT