Student Bus Pass  sakal
महाराष्ट्र बातम्या

Student Bus Pass : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटीचे पास;राज्य परिवहन महामंडळ उद्यापासून विशेष मोहीम राबविणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशामध्ये शाळा, महाविद्यालय, शिक्षकवृंद यांच्यासोबतच राज्य परिवहन महामंडळाचाही मोलाचा वाटा आहे. अत्यल्प दरात विद्यार्थ्यांना, तर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून एसटीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, मुंबई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशामध्ये शाळा, महाविद्यालय, शिक्षकवृंद यांच्यासोबतच राज्य परिवहन महामंडळाचाही मोलाचा वाटा आहे. अत्यल्प दरात विद्यार्थ्यांना, तर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून एसटीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यातच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळा-महाविद्यालयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

येत्या १८ जूनपासून राज्यात एसटी प्रशासनातर्फे ‘ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ‘ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शाळा/महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे मासिक पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

विदर्भ वगळता राज्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक पर्वाचा शुभारंभ झाला आहे. तर विदर्भात १ जुलैपासून शाळा सुरू होणार आहे. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटीमधून शालेय प्रवासासाठी मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

एसटीमध्ये दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एसटीला महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन मानले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा/महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

विद्यार्थ्यांची यादी तयार

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

एसटीत ३४ हजार चालक

एसटीमध्ये कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे ३४ हजार चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT