schools sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार ‘अपार कार्ड’! शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबणार; कार्डमध्ये असणार विद्यार्थ्यांची ‘ही’ माहिती

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या आणण्यासाठी आता ‘अपार’ आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या आणण्यासाठी आता ‘अपार’ (ॲटोमेटेड पर्मनंट ॲकेडमिक रेजिस्ट्री) आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजीलॉकर’च्या मदतीने ‘अपार’मधून सर्व शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येतील.

आधारकार्डच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना आता अपार आयडी तथा कार्ड दिले जाणार आहे. सुरवातीला नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ते कार्ड देण्यात येणार होते, पण आता सर्वांनाच दिले जात आहे. त्यासाठी पालकांचे संमतीपत्र लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या चार हजार ७१६ शाळांमधील सात लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना ते अपार कार्ड दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांना ‘अपार’ आयडीसंदर्भात सांगून त्यांचे संमतीपत्र घ्यायचे आहे. त्यासाठी अजून मुदत नाही, पण ‘एक राष्ट्र एक ओळखपत्र’ या धोरणानुसार देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ते कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कागदपत्रांऐवजी आता या कार्डवरच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. सध्या दिवाळी सुटीनंतर शाळा सुरु झाल्यावर वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ‘अपार’ कार्डसाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

पालकांची संमती आवश्यक असून पालकांनी तो अर्ज भरून द्यायचा आहे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ‘अपार आयडी’ काढला जात आहे. यु-डायस प्रणालीवर आधार प्रमाणीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना अपार कार्ड दिले जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा संपूर्ण लेखाजोखा असणार आहे. त्यासाठी पालकांची संमती आवश्यक असून पालकांनी तो अर्ज भरून द्यायचा आहे. सध्या पालकांच्या बैठका घेतल्या जात असून विद्यार्थ्यांनाही त्यांसदर्भात माहिती देण्यात आली आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

‘अपार’ आयडीचे फायदे

  • विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांचा प्रगती अहवाल, शाळाबाह्य विद्यार्थी, अर्ध्यातून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता येईल

  • आयडी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा एका जिल्ह्यातून, राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवणे सुलभ होईल

  • राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे ‘अपार’ आयडी विद्या समिक्षा केंद्राला जोडण्यात येणार असून त्या माहितीवरून मूल्यमापन करून नवीन उपक्रम राबविता येईल

  • ‘अपार’ला ‘डिजिलॉकर’ जोडले जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षणात साध्य केलेले लक्ष्य, दहावी-बारावी बोर्डाचे निकाल, एकत्रित प्रगती अहवाल, अन्य उपक्रमांमधील यश हे त्यावरुन पाहता येईल

  • जिल्ह्यातील अपारची सद्य:स्थिती

  • एकूण शाळा

  • ४,७१६

  • एकूण विद्यार्थी

  • ७.६८ लाख

  • ‘अपार’ आयडी मिळालेले

  • ३७,५७०

  • ‘अपार’ आयडी न मिळालेले

  • ७,३०,४३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : राजकीय पुढारी, उमेदवारांचे शहर महामार्गांवर मोठाले बॅनर

SCROLL FOR NEXT