Success Story sakal
महाराष्ट्र बातम्या

Success Story : घरची परस्थिती बेताची... पेपर वाटून केला अभ्यास, वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी झाली CA

Pune Latest Update: प्रज्योती हिचे प्राथमिक शिक्षण निरवांगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

Valchadnagar: निरवांगी (ता.इंदापूर) येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या प्रज्योती बापुराव बोबडे या मुलीने जिद्द व चिकाटी जोरावर वडिलांच्या निधनानंतर सी.एच्या परीक्षेमध्ये यश मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

निरवांगी मधील बोबडे कुंटूब गेल्या अनेक वर्षापासुन वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम करीत आहे. तसेच बसस्टॅंडवरती छोटेसे किराणामालाचे दुकान चालवत आहे. वृत्तपत्र विक्रेता कै.बापुराव बोबडे व विजया बोबडे यांची थोरली मुलगी प्रज्योतीने हिने उच्च शिक्षण घेवून सीए व्हावे अशी बापुराव बोबडे यांची इच्छा होती. प्रज्योती हिचे प्राथमिक शिक्षण निरवांगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

माध्यमिक शिक्षण पद्मभूषण वसंतदादा माध्यमिक विद्यालय निरवांगी व एन.ई.एस हायस्कुल निमसाखर मध्ये झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयामध्ये झाले.उच्च शिक्षण कळंबमधील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये झाले. प्रज्योती हिला सुरवातीपासुन चार्टर्ड अकाउंटन होण्याची इच्छा होती.तिने सुरवातीपासुन जिद्द,चिकाटीसोडली नाही.

२०१९ मध्ये सी.ए ची पहिली परीक्षा फाउंडेशन उर्तीण झाली. २०२०साली इंटरमेजिएट परीक्षा पास झाली. तीन वर्ष इंटरशिप केल्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या सीएच्या फायनल परीक्षेमध्ये यश मिळविले.

वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

प्रज्योती बोबडे हिचे वडिल बापुराव यांचे १ एप्रिल २०२२ साली त्यांचा हद् य विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी प्रज्योतीने मनाने खचली होती. शिक्षण अर्धवट सोडावे असा ही विचार मनामध्ये आला होता. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने परीक्षा देवून सी.ए.च्या परीक्षेमध्ये यश मिळविले.

आईने दिली मोलाची साथ

निरवांगीमधील बोबडे यांचे कुंटूब साधे आहे.शेती कमी असल्यामुळे वृत्तपत्र विक्री व दुकानातुन येणाऱ्या पैशावरती कुंटूब चालविण्याची कसरत विजया बोबडे यांना करावी लागत आहे.विजया बोबडे हिने प्रज्योतीला साथ देवून स्वप्नपूर्ती प्रयत्न केले. तसेच लहान बहीण संज्योती व भाउ अविराज यांनी ही मदत केली.

वृत्तपत्र विक्रीचे ही केले काम

प्रज्योती बोबडे हिची घरची परस्थिती बेताची असल्यामुळे बारावीपर्यत शिक्षण घेत असताना सकाळी दुकानामध्ये वृत्तपत्र विक्रीचे काम केले. तसेच शाळा सुटल्यावर दुकानामध्ये काम केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT