Success Story MPSC Exam Deputy Collector Vinayak Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'यशाला शॉर्टकट नाहीच'! MPSC मध्ये प्रथम आलेल्या विनायक पाटलांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला 'हा' मोलाचा सल्ला

गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. कठोर परिश्रम, कमालीचा संयम ठेवल्यास यश निश्चित मिळते.

सकाळ डिजिटल टीम

स्वयंअभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेत तीन वेगवेगळ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.

-यशवंत पाटील

Success Story Vinayak Patil : ‘यशाला शॉर्टकट नाही. ध्येय निश्चित झाल्यावर यशाच्या दिशेने वाटचाल करा. गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. कठोर परिश्रम, कमालीचा संयम ठेवल्यास यश निश्चित मिळते,’ असा सल्ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) राज्यात प्रथम आलेल्या मुदाळ (ता. भुदरगड) येथील विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil) यांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला.

प्रश्न : आपली कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे?

मी मुदाळ (ता. भुदरगड) या गावातील असून, आई-वडील शेती करतात. माझे प्राथमिक शिक्षण गावातच मराठी शाळेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण प. बा. पाटील माध्यमिक विद्यालयात झाले. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये २०२१ मध्ये बी. एस्सी. संख्याशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर स्वयंअभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेत तीन वेगवेगळ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. नुकत्याच जाहीर झालेल्या उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो.

प्रश्न : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे कधी ठरवले? प्रशासकीय सेवेत जाण्याचा उद्देश काय?

उत्तर : माझ्या मुदाळ गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व शिष्यवृत्ती परीक्षा देत होतो. चौथीपासूनच मला शिष्यवृत्ती परीक्षांविषयी आवड निर्माण झाली होती. प्राथमिक शाळेतच माझा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम झाला. मात्र, १२ वीनंतरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, हे निश्चित केले. त्यानुसार १२ वी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये २०१९ ला बीएस्सीला प्रवेश घेतला आणि पहिल्या वर्षापासूनच झपाटून अभ्यासाला लागलो. प्रशासकीय सेवा सर्वांनाच खुणावते, पण मला उच्चपदावर जाऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे. मी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्याने मला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहे, त्यामुळेच मी हे क्षेत्र निवडले.

प्रश्न : पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करताना कोणत्या बाबींकडे जास्त लक्ष दिले?

स्पर्धा परीक्षा म्हटले की सर्वच विषयांचा सांगोपांग अभ्यास करावा लागतो. बुकलिस्ट समानच असतात. इतरांप्रमाणे मीसुद्धा त्यांचा वापर केला. आयोगाचा अभ्यासक्रम, मागील परीक्षांना कोणते प्रश्न आले होते, त्याबाबत विश्लेषण केले. अवांतर वाचनावर भर देऊन स्वतः नोट्स काढल्या. अनेक पुस्तके, वृत्तपत्रे वाचली. सात ते आठ तास अभ्यास, चालू घटना घडामोडींचा अभ्यास केला.

प्रश्न : मुलाखतीची तयारी कशी केली?

मुलाखतीची तयारी करत असताना प्रथम आपली घरची तसेच शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रशासनात कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो याबाबत परिपूर्ण माहिती करून घेतली. आयोगाच्या मागील मुलाखतींवेळी कोणते प्रश्न विचारले होते, याची उजळणी केली. सोशल मीडियावर मुलाखती ऐकल्या, प्रश्न कसे विचारले जातात याची माहिती घेतली. मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशनवर भर दिला तसेच मुलाखत कशी द्यावी याची खासगी क्लास तसेच मित्रांमध्ये तयारी करून घेतली. त्यामुळे आत्मविश्वास वाढल्याने मुलाखतीला धाडसाने सामोरे गेलो.

प्रश्न : स्पर्धा परीक्षार्थींना विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना काय सांगाल?

स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थी अनेक पर्याय समोर ठेवतात. त्यांना माझा सल्ला आहे की, यशाला शॉर्टकट नसतो. प्रथम तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करून परिश्रम करा. परीक्षा टार्गेट करा. पूर्ण तयारीने परीक्षेला सामोरे जा. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच याची खात्री नाही, पण नाउमेद होऊ नका. याबरोबरच आपल्या कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचाही विचार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT