तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा येथील भूमिपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्याला असलेले अभियंते सुमित दीपकराव बंडेवार यांनी कोरोना महामारीच्या परिस्थितीची प्रेरणा घेऊन कोरोना व इतर विषाणू नष्ट करण्यासाठी उपयुक्त व प्रभावी ठरणाऱ्या युव्ही- रक्षक नावाच्या साधनांची ( स्टिक) निर्मिती केली आहे. सुमित यांनी पुणे येथे स्वतःची 'एम्बेल टेक्नॉलॉजी' नावाची प्रायव्हेट कंपनी तयार केली असून या कंपनीद्वारे युव्ही-रक्षकची निर्मिती केली आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध बोस्टन विद्यापीठाने युव्हीसी रेंज हे कोरोना व सर्व प्रकारचे विषाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरतात, हे सिद्ध केले असून युव्ही- रक्षकमध्ये याच तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथील केंद्र सरकारच्या एनआयएमए या संस्थेने या स्टिकला अधिकृत मान्यता दिली आहे. युव्ही- रक्षकच्या वापर विविध प्रकारचे कॉर्पोरेट हाऊस, व्यावसायिक प्रतिष्ठाने, तारांकित हॉटेल, शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालय, घरांमध्ये करता येऊ शकते. मानवी शरीर, फळे, भाज्या, खाद्यपदार्थ हे वगळता इतर विविध ठिकाणी असणारे कोरोना व सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणू नष्ट करण्यासाठी या स्टीकचा चांगला वापर होतो. दैनंदिन वापरातील निर्जीव वस्तूवर असणारे विषाणू मानवास जीवघेणे ठरुन विविध आजारांना कारणीभूत ठरु शकतात.
हेही वाचा - डेल्टा आणि अल्फा व्हेरियंटचा लसीवर काय परिणाम करतात, याबाबत इंग्लंड आणि स्कॉटलंडनेही संशोधन केले आहे.
युव्ही- रक्षक ही स्टिक घरगुती वस्तू, कपडे, लहान मुलांची खेळणी, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोफा, मोबाईल, सर्व प्रकारची वाहने, लॅपटॉप, फर्निचर, टीव्ही आदी रोजच्या वापरातील वस्तूंवर असणारे पण न दिसणारे कोरोना व इतर विषाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. या स्टिकमध्ये सर्व प्रकारचे विषाणू नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अल्ट्रावायलेट रेंजचा वापर केला आहे. खेळण्यासारखे असले तरी या स्टीकचा लहान मुलांकडून वापर टाळणे आवश्यक आहे. एक प्रकारे हे मानवी शरीर व फळे, भाज्या, खाद्यपदार्थ आदींना वगळून वापरातील निर्जीव वस्तूंसाठी सॅनेटराइज म्हणून प्रभावीपणे फायद्याचे ठरले आहे.
एका वर्षापर्यंत युव्ही- रक्षकचा नियमित वापर करता येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया व मेक इन इंडिया अंतर्गत युव्ही- रक्षकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विटरद्वारे या स्टिकची माहिती दिली असून त्यांनी रिट्विट करीत प्रतिसाद दिला आहे. गुजरातमधील बँक ऑफ बडोदा व कर्नाटका टुरिझमकडून या स्टिकचा वापर होत आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांच्यासमोर सादरीकरण झाले आहे.
येथे क्लिक करा - पहिल्यासारखे नाटकांचे प्रयोग व्हावेत अशी आशा कलाकारांमध्ये आहे
स्वतः मधील सर्जनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न
" कोरोना महामारीच्या संकटाला संधी समजून स्वतः मधील सर्जनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न झाला आहे. युव्ही- रक्षक निर्मितीसाठी आई- वडील यांचा पाठिंबा, पत्नी पूजा हिचे सहकार्य व प्रामुख्याने कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हीच खरी प्रेरणा आहे.
- सुमित बंडेवार, अभियंते, तामसा, जिल्हा नांदेड, ह. मु. पुणे
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.