कोल्हापूर: ड्रॅगन (Dragon)हे नाव चीनच्या (China) संदर्भाशी जोडलं जातं. पण हे चिन पुरतचं मर्यादित राहिलेले नाही तर ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) चे आता महाराष्टात उत्पादन होत आहे. या फळाला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय त्याचे उपयुक्त गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हे फळ कोरड्या जमिनीत आणि कमी पाण्यात भरघोस उत्पादन देत असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीकडे वळला आहे. शिवाय शेतकरी आता परदेशात निर्यात करत आहेत. सांगली जिल्ह्यातील तडसर ता. कडेगाव या गावातील शेतकऱ्यांनी दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केला आहे. (successful-farming-in-dragon-fruit-sangli-farmer-dragon-fruit-export-to-dubai-agriculture-trading-news)
ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, अमेरिका आणि व्हियेतनाम यासारख्या देशांमध्ये घेतले जाते. भारतामध्ये याचे उत्पादन 1990 च्या दशकात सुरू झाले. अगदी सुरुवातीला होम गार्डन म्हणून याची सुरुवात झाली. ड्रॅगन फ्रुट मध्ये असलेले औषधी गुणधर्म यामुळे याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात भारतात वाढली. आणि हळूहळू विविध राज्यातील शेतकरी फळ शेतीची लागवड म्हणून याकडे वळू लागला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑल इंडिया रेडिओ वरून 'मन की बात' या कार्यक्रमात गुजरातच्या कच्छ भागातील ड्रॅगन फळांच्या शेतीबद्दल वर्णन केले आहे. शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी गुजरातच्या कच्छ मधील ज्या शेतक-यांनी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली त्या शेतकऱ्याचे त्यांनी अभिनंदन केले होते.
भारतात येथे होते लागवड
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू,महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, आणि अंदमान निकोबार या बेटांवर लागवड केली जाते.
ड्रॅगन चे प्रकार आहेत
गुलाबी त्वचेचे सह पांढरा गाभा
गुलाबी त्वचे सह लाल गाभा
पिवळ्या त्वचेसह पांढरा गाभा
ड्रॅगनचे आरोग्याला फायदे
ड्रॅगन फ्रुट मध्ये फायबर, जीवनसत्त्वे ,खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. ऑंटीअक्सिडंट मुळे ताणतणावामुळे निर्माण झालेल्या सेलचे नुकसान भरून काढतात.आणि जळजळ कमी करतात.या फळामुळे पाचन तंत्र सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
सांगलीत अशी सुरुवात झाली
सांगली जिल्ह्यातील जत येथील शेतकरी संभाजी कोडग यांनी दहा वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग करायला सुरूवात केली. या फळाला मागणी जास्त असल्यामुळे त्यांनी हे फळ परदेशात पाठवण्यास सुरुवात केली. हळूहळू सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात केली. कमी पाण्यात आणि कोरड्या जमिनीत येणारे फळ भरघोस उत्पादन देणारे असल्यामुळे सध्या सुमारे 90 ते 100 शेतकरी ड्रॅगन फ्रुट ची लागवड करत आहेत. दोन दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातील आनंदराव पवार व राजाराम देशमुख यांनी दुबईला ड्रॅगन फ्रुट पाठवले आहे.
सुरुवातीचे काही वर्षे या ड्रगन शेतीतून आनंदराव पवार, राजाराम देशमुख, या दोघांनाही जेमतेम पण चांगले उत्पादन मिळाले.आनंदराव पवार यांनी 2016 मध्ये लागवड करताना लागवडिस 5 लाख खर्च आला. मागील वर्षी उत्पादन- 7 टन आले.तर 4 लाख 50 हजार उत्पन्न मिळाले.तर राजाराम देशमुख याना लागवडीस आलेला खर्च- 4.75 लाख आला.तर आलेले उत्पादन होते 10 टन .मागील वर्षी राजराम याना 7 लाख 50 हजार उत्पन्न मिळाले.
सांगली तालुक्यात ड्रॅगनची लागवड
जत ,तासगाव ,कडेगाव ,मिरज
आतापर्यंत लागवडी खालील क्षेत्र
सुमारे 150 एकर
शेतकऱ्यांची संख्या
90 ते 100
यावर्षी 50 एकरांवर क्षेत्र वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. कमी पाण्यावर येणारे हे फळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी याची लागवड जास्त करावी.
बसवराज मासतोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.