Sudhir Mungantiwar Pay compensation in time otherwise charge interest new law regarding wild animal attacks  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar : भरपाई वेळेत द्या, अन्यथा अधिकाऱ्यांकडून व्याज वसूल करू; सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री मुनगंटीवार यांचा इशारा; वन्य प्राणी हल्ल्याप्रकरणी भरपाईबाबत नवा कायदा करणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्यातील जखमी नागरिकांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई ३० दिवसांच्या आत न भरपाई रक्कम देणे बंधनकारक आहे. ते न दिल्यास त्या रकमेवरील सरकारी दराने व्याज अधिकाऱ्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत गुरुवारी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात बिबट्यांचा वाढलेला वावर, ७७ बिबट्यांनी ५०० जनावरे ठार केली आहेत. तसेच एका लहान मुलाचाही बळी घेतल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि मानसिंग नाईक यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. या चर्चेत समीर कुन्नावार, अनिल बाबर, नाना पटोले, दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला.

बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला असून त्यामुळे जीवितहानीचा धोका आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांचे नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जलद कृती दलाची स्थापना करण्याची गरज आहे, अशी मागणी पाटील यांनी केली.

तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना,जखमींना तसेच पिकांच्या नुकसानीबद्दल भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई दिली जात नाही,असा मुद्दाही उपस्थित केला. तसेच गडचिरोलीप्रमाणे बिबट्यांचा वावर वाळवा आणि शिराळा तालुक्यात शेतीला दिवसा वीज द्यावी, अशी मागणी केली.

‘‘नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी सरकार दक्ष आहे. पण अधिकाऱ्यांच्या पातळीवर जर दिरंगाई होत असेल तर तसा कायदा करून ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक करू. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्याकडून सरकारी दराने व्याज वसूल करून ती मदत शेतकऱ्यांना दिली जाईल.

तसेच वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान, हल्ले, त्यावरील उपाययोजना, सरकारी मदत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी केलेले उपाय आदींबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल.

ही समिती या उपाययोजनांतील त्रुटींचा अहवाल पुढील अधिवेशनाच्या आधी सरकारला देईल,’’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक यांनी पीक नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. पीक उगवून आलेले असते तेव्हा त्याचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले तर ते पीक काढणीला आले नसल्याचे सांगून अधिकारी भरपाई नाकारतात.

हा नव्याने शोध अधिकारी लावत आहेत. पीक लहान मोठे नसते. त्यामुळे त्याची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी बिबट्यांच्या प्रजनन क्षमतेवर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली.

चूक वनधिकाऱ्यांची नाही तर उपमुख्यमंत्र्यांची

गाणी लावण्याच्या सल्ल्यावर जयंत पाटील यांनी मिश्किल टिपण्णी करत, वनअधिकारी गाणी लावायला सांगत असतील तर ती अधिकाऱ्यांची चूक नाही, ती चूक उपमुख्यमंत्र्यांची आहे. मुनगंटीवार यांना वन आणि सांस्कृतिक खाते दिल्याने वनात गाणी लावायचा सल्ला दिला जात आहे, असा टोला लगावताच सभागृहात हशा पिकला.

आमदारांची घेतली शाळा

अनिल बाबर यांनी बिबट्यांना रोखण्याची मागणी केल्यानंतर ‘बिबटे गावाजवळ आले तर गाणी लावा, असा अजब सल्ला वनअधिकारी गावकऱ्यांना देतात,’ असे बाबर यांनी सांगितले. यावर वनमंत्र्यांनी बाबर यांचीच शाळा घेतली. आपण आमदार आहात, आपल्याला सरकार पगार देते, त्यातून लेटरहेड छापून घ्या आणि लेटरहेडवर त्याबाबत तक्रार करा, लक्षवेधी लागेपर्यंत वाट कसली बघता. असा कुठला अधिकारी सल्ला देत असेल तर आपण त्यांना गाणी ऐकण्यासाठी भरपूर वेळ देऊ, असेही ते म्हणाले.

एक लाख शेतकऱ्यांना कुंपण

वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा वावर असलेल्या ठिकाणच्या एक लाख शेतकऱ्यांना कुंपण देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्र्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT