Sujata Saunik 
महाराष्ट्र बातम्या

Sujata Saunik: सुजाता सौनिक बनणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव? जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

first woman Chief Secretary Sujata Saunik? करीर हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार, सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करीर यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. करीर हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार, सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

सुजाता सौनिक या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या १९८७ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांचाच क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे त्यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. असं झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव असणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे लक्ष असणार आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक ( १९८७ च्या तुकडीतील). महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार ( १९८८ च्या तुकडीतील) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८७ च्या तुकडीतील) हे मुख्य सचिवपदासाठी दावेदार आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते याबाबतचे चित्र आज किंवा उद्या स्पष्ट होऊ शकते.

सौनिक यांना मुख्य सचिव करून राज्य सरकार महिलांचा सन्मान करत असल्याचं चित्र निर्माण करू शकते. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याआधी सौनिक यांना मुख्य सचिव पदाने दोनवेळा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यावेळी त्यांना संधी मिळते का? आणि इतिहास घडतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोण आहेत सुजाता सौनिक?

सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. १९८७ बॅचच्या सौनिक या जून २०२५ मध्ये निवृत्त होत आहेत. त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास पती आणि पत्नी मुख्य सचिव झाल्याची ही पहिलीच वेळ असेल.

सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात मास्टर्स केले आहे. त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. गेल्या तीन दशकांपासून त्या प्रशासकीय सेवेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT