Summer Youth Summit 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Summer Youth Summit : समर युथ समिटमध्ये आजपासून विचारांचा जागर

‘यिन’च्या शिबिराचे पुण्यात होणार मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - समर युथ समिट २०२४ चे पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे मंगळवारी (ता.११) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटन होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून तरुणाई कालच पुण्यात दाखल झाली.

उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी, पर्सिस्टंट सिस्टम्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, उच्च शिक्षणचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीईटी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत समर युथ समिटचे उद्‍घाटन होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात युवकांशी आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास, सेवा, मानसिक आरोग्य, योग आणि ध्यानधारणा, सकारात्मक विचार या विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती संवाद साधणार आहेत. दोन दिवसांमधील विशेष आकर्षण म्हणजे समूह सत्रामध्ये कंटेंट क्रिएटर संवाद साधणार आहे.

सेलिब्रिटी सत्रामध्ये कलाकारांशी गप्पा मारल्या जाणार आहेत. राजकीय सत्रामध्ये नेतृत्व कसे घडते यावर भाष्य होईल. सायंकाळी प्रसिद्ध गायकांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. या समिटसाठी काहीच तास शिल्लक राहिल्याने कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकता लागली आहे.

समर युथ समिट २०२४ हे सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘यिन’, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या शिबिरासाठी के.जे. कॉलेज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, महाएनजीओ फेडरेशन, ए.आय.एस.एस.एम. सोसायटी, एस.एस. मोबाईल्स आणि फ्रेमबॉक्स ऍनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ८७९३० ६२०११

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासू, अनुभवी मान्यवर या संस्थेमधून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहेत. असेच काम ‘यिन’च्या माध्यमातून होत आहे. ‘यिन’च्या या उपक्रमास शुभेच्छा.

- हर्षवर्धन पाटील, कुलपती, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT