NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis: आगामी निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंना घरातूनच आव्हान?; ‘त्या’ होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार घराण्यातच रस्सीखेच होण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार शिवसेना- भाजपसोबत यांच्यासोबत आहेत, तर शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात लढताना दिसण्याची शक्यता आहे.

फूट पडल्यापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करतानाचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान आगामी निवडणुकीमध्ये यावेळी दोन्ही गटात कुटुंबामध्येच लढत होणार असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ आहे. सध्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना येथून कोण आव्हान देणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक खरंच लढवणार का? याबाबत कोणतीही आधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी याबाबतचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने भले मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यावर सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांचा फोटो आहे. तसेच सोबत संसदेचा फोटोही होर्डिंग्जवर लावण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

त्यावर सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बारामतीतून सध्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT