शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला पोहचलंय. कारण मंत्रिमंडळ विस्ताराची यादी आल्यानंतर आता सेनेत नाराजी वाढू लागलीय. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांचं नाव अखेरच्या क्षणी वगळ्यात आलं. त्यामुळं ते नाराज असल्याचं कळतंय. सुनिल राऊत ते शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत. उद्या ते विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
महत्त्वाची बातमी : नाराज राजू शेट्टींबद्दल नवाब मलिक म्हणतात..
शिवसेनेतील सुनील राऊत यांच्या नाराजीवर भाऊ खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये. आम्ही कायम पार्टी आणि ठाकरे परिवारासोबत आहोत. कोणीतरी चुकीची बातमी पसरवली असं, खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. हे तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्षात अनेक होतकरू नेते आहेत. कोट्यात जेवढी मंत्रिपदे आलीत त्यानांच मंत्रिपद देण्यात आलं. आम्ही मागणारी लोकं नसून आम्ही देणारी लोकं आहोत. आम्ही कधीही काही मागितलं नाही असं संजय राऊत यानी म्हटलंय.
तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती समोर येतेय. कालपर्यंत तानाजी सावंत यांचं नाव मंत्रिपदाच्या संभाव्य नेत्यांमध्ये होती. मात्र शेवटच्या क्षणाला तानाजी सावंत यांच्या नवा ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची अधिकृत यादीत आणि मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली पहायला मिळाली.
तानाजी सावंत माजी मंत्री राहिलेत. त्यामुळे आता शिवसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळतेय. आपल्याला मंत्रिपद का दिलं नाही याची विचारपूस करण्यासाठी तानाजी सावंत मातोश्रीवर देखील पोहोचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांची कशाप्रकारे समजूत काढलीये ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
WebTitle : sunil raut and tanaji sawant upset over not getting ministry in maharashtra cabinet
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.