नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना कॉंग्रेस पक्षाने निलंबीत केले. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आता सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Support Satyajeet Tambe In Nashik Mlc Elections Radhakrishna Vikhe Patil )
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांचे स्टेटस ठेवले आहेत. मात्र, हा निर्णय पक्षाचा नाही. असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपचा अधिकृतपणे निर्णय आणि आदेश नसला तरी अंतर्गत सूचनांवरून कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळत रंगली आहे.
काय म्हणाले विखे पाटील
निर्णय जाहिर करण्याचा प्रश्न नाही. कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, पक्षाच्या वतीने पाठिंबा अजून जाहिर नाही. कार्यकर्त्यांनी स्टेटल ठेवल्यावर प्रश्न विचारलं असता विखे पाटील म्हणाले, कार्यकर्ता स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी सुजय विखे पाटील यांनी भूमी पुत्रांना न्याय दिले पाहिजे. यासंदर्भात विचारले असता. विखे पाटील म्हणाले, त्यांचे हे विधान सकारात्मक घेतले पाहिजे.
विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासंबंधी भाजपचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. तांबे हे नगर जिल्ह्यातील असल्याने स्थानिक पातळीवर याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना वरिष्ठांकडून आल्या होत्या. त्यानंतर अधिकृत घोषणा न करता कार्यकर्त्यांना अंतर्गत सूचना दिल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.