Nawab Malik 
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik Bail: नवाब मलिक यांना 'सुप्रीम' दिलासा! वैद्यकीय जामीन कायम, ED ची हरकत नाही

Supreme Court big relief to Nawab Malik: सुप्रीम कोर्टाने मलिक यांना मोठा दिलासा दिलाय असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे मलिक यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने विरोध केला नाही.

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा मेडिकल जामीन कोर्टाने कायम ठेवला आहे. जोपर्यंत आजारी आहेत तोपर्यंत त्यांना जेलच्या बाहेर राहता येणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मलिक यांना मोठा दिलासा दिलाय असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे मलिक यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने विरोध केला नाही.

नवाब मलिक हे काही दिवसांपासून मेडिकल जामीनावर बाहेर आहेत. मलिक यांनी जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. याआधी त्यांना आठवडा किंवा दोन आठवडा अशी मुदत मिळत होती. त्यामुळे त्यांना वारंवार अंतरिम जामीनासाठी अर्ज करावा लागत होता.

नबाल मलिक यांच्या जामीनावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत नवाब मलिक हे आजारी आहेत, तोपर्यंत ते बाहेर राहू शकतील. त्यांना तोपर्यंत तुरुंगात टाकता येणार नाही. याशिवाय, ते आजारी असेपर्यंत जामीनावर राहू शकतात, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय सक्तवसुली संचालनालयाने देखील याला कसलाही विरोध केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंडमधील मनी लँडरिंगप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक दीड वर्ष तुरुंगात होते. नवाब मलिक हे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना काही अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला होता. ११ ऑगस्ट रोजी नवाब मलिक यांना जामीन मिळाला होता. तेव्हापासून ते अंतरिम जामीनावर बाहेर आहेत.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ईडीची नवाब मलिक यांच्याविरोधातील कारवाई थंडावली असल्याचा आरोप करण्यात येतो. नवाब मलिक हे सध्या अजित पवार गटासोबत आहेत. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्यांच्या महायुतीमधील सहभागाला विरोध दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अजित पवारांना पत्र लिहिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi यांची १४ नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा, वाहतुकीत मोठा बदल, महत्त्वाचे मार्ग बंद ठेवणार

IPL 2025: दिल्ली संघात २०११ वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री! १८ व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

Sharad Pawar : चुकीची कामे किती करावी, फसवेगिरी किती करावी; फसवेगिरी करणाऱ्यांना धडा शिकवा

Women’s Asian Champions Trophy: दीपिकाच्या गोलमुळे भारताचा विजय; दक्षिण कोरियावर ३-२ने मात

Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....

SCROLL FOR NEXT