Supreme Court is the last ray of hope Shiv Sena reaction before the hearing 
महाराष्ट्र बातम्या

सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण; सुनावणीपूर्वी शिवसेनेची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण उरलेला आहे. असं वक्तव्य राऊत यांनी यावेळी केलं आहे. (Supreme Court is the last ray of hope Shiv Sena reaction before the hearing Maharashtra Politics )

सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दरम्यान राऊतांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील राजकारणावर बोलताना माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या १२ आमदारांच्या पत्राच्या सहीसंदर्भात केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण उरलेला आहे. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी सुनावणीपूर्वी दिली. तसेच सरकारवर निशाणा साधत देशातील यंत्रणा गुलामी करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणूक आयोगाचा निर्णय अतिरेकी. आयोगाचा निर्णय हा एकतर्फी आहे. २ हजारं कोटींच पॅकेज वापरंल. सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक आयोगाचा निर्णय असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. जनता शिवसैनिक पेटून उठले आहेत.

निवडणुक घ्यायची हिंमत दाखवा मग पाहू. गेल्या ५ महिन्यातलं राजकारण असत्याच्या आधारावर. खवळलेल्या जनतेला कसं गप्प कराल? नेते, पदाधिकारी खरेदी करण्यासाठी रेट कार्ड ठरलेलं आहे. असा दावा राऊत यांनी यावेळी केला.

कोश्यारी यांच्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, कोश्यारी खोटं बोलतायत कॅबिनेटची शिफारस ७२ तासांत मंजूर करायची असते. कोश्यारी भाजपच्या आदेशाने वागत होते. त्यांनी घटनात्मक कर्तव्य का पाळलं नाही हे सांगावं. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT