Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांचं मशाल चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात आज फैसला

रोहित कणसे

Thackeray Shivsena Latest Update : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली, यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले. या सत्तासंघर्षाच्या लढाईदरम्यान शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण काही काळासाठी गोठवण्यात आलं आणि नंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाला मिळाले.

दरम्यान उद्धव ठाकरे गटाला निवडणूकत देण्यात आलेलं मशाल हे चिन्ह देखील आता अडचणीत आलं आहे. या समता पार्टीने उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याबाबत सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्ह देण्यात आले होते त्याविरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

उद्धव ठाकरेंना दिलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीचा आक्षेप असून समता पार्टीचे उदित मंडल यांनी सुप्रीम कोर्टात याबद्दल याचिका दाखल केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार याचे भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. यापुर्वी मंडल यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण कोर्टानं ती रद्दबातल ठरवली होती त्यामुळं समता पार्टीनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

आजच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. १९९६ पासून मशाल हे आमचं पक्ष चिन्ह आहे, असं सांगत समता पक्षाच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले 'मशाल' हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे नाही. तर ते अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो, असं उत्तर निवडणूक आयोगाने समता पक्षाला दिले होते. मात्र, उत्तराचे समाधान न झाल्याने समता पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

Paani Movie Review: हे नाही पाहिलं तर काय पहिलं! सरळ, साध्या माणसाची असामान्य गोष्ट दाखवणारा 'पाणी' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Dill Mil Gaye : दिल मिल गये या गाजलेल्या मालिकेतील डॉ. रिद्धिमा आठवतेय का ? आता ओळखणंही झालंय कठीण

Senior Women T-20 Cricket : वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईश्वरी, तेजस्विनी! टी-ट्वेंटी स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Latest Maharashtra News Updates Live : 55व्या इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT