Sharad Pawar On Ajit Pawar ESakal
महाराष्ट्र बातम्या

Politics: विधानसभेआधी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, अजितदादांचं टेन्शन वाढणार!

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही स्वतंत्र निवडणूक चिन्ह मिळावे, अशी सुप्रिया सुळेंनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे.

Vrushal Karmarkar

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना समान वागणूक मिळावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. ज्याप्रमाणे आपल्या पक्षाला नवे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे, तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटासाठीही केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. खासदार सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीने (एसपी) सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय मागितला आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा शरद पवार गटाने हे पाऊल उचलले आहे.

जुलै 2023 मध्ये, अजित पवार इतर अनेक आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले, ज्यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली. विभाजनापूर्वी शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह 'घड्याळ' होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि 'घड्याळ' चिन्ह वाटप केले होते.

तर 19 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांच्या गटाला लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची परवानगी दिली होती. अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक चिन्ह 'घड्याळ' वापरण्यापासून रोखण्याची मागणी करणाऱ्या शरद पवार गटाच्या याचिकेनंतर हा आदेश देण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्याची मागणी केली. या याचिकेवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन राजकीय पक्ष एकाच निवडणूक चिन्हावर दावा करत असून न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT