Supriya Sule News: इस्त्राइल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. या युद्धामुळे जगभरात दोन समर्थकांचा गट निर्माण झाले आहेत. देशातील अनेक संघटना आणि पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं. शरद पवारांच्या इस्राइल-पॅलेस्टाईनवरील वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला आणि त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना गाझा पट्टीत पाठवण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही पवार साहेबांच वक्तव्य नीट वाचल नसेल. फक्त आयटी सेल ॲक्टीव्ह झालं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार म्हणाले होते की, 'भारतीय पंतप्रधान कायम पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले आहेत. हे दुर्दैवी आहे की पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राइलसोबत आहेत. मोदींनी मूळ मुद्द्याला बगल दिली आहे. आपण आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट असलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांची मूळ भूमी आहे, त्यांच्याबाजूने आम्ही आहोत.'
शरद पवार म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी, जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी या सर्वांचे पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहण्याचे सारखेच विचार होते. भारत सरकारची ही भूमिका नेहमीच होती. खरा मुद्दा बाजूला ठेवून प्रथमच आपले पंतप्रधान इस्राइलच्या पाठीशी उभे आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.