Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: 'माझ्या लग्नात वर्‍हाडींना फक्त एक पेढा दिला' सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा

रुपेश नामदास

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इंदापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांना भेटी देत दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्ना विषयी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मी माझ्या मुलीच्या लग्नात कोणताही मोठे पणा करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी कोणताही मोठे पणा केला नाही माझ्या लग्नात फटाके वाजवले नाहीत.

फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते, पण जिन्स घातलेल्यापेक्षा मॉर्डन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर शिंदे सरकारवर देखील टीका केली, त्या म्हणाल्या, 50 खोक्यामुळे आपलं सरकार गेलं, जाऊद्या, अपना टाईम आएगा, जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत असायची तेव्हा महाराष्ट्र धावून जायचा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत गेला तर देशाचं राजकारण हलायचं, पण महाराष्ट्राला दिल्ली चावलते. असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान खासदास सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघात दौरा चालू आहे. विविधा भागात जावून त्या कार्यकर्त्याशी संवाद साधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT