supriya sule ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule vs Ajit Pawar:सुप्रिया सुळे यांनी दिलं रतन टाटांचं उदाहरण.. अजित पवारांच्या टीकेला सणसणीत उत्तर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटात शाब्दिक चकमक बघायला मिळाली. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या दोन सभा वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाल्या. या सभांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण-भावांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी सणसणीत उत्तर दिले.

अजित पवार यांनी एमईटी या ठिकाणी झालेल्या सभेत अनेक गोष्टींवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, "प्रत्येकाचा काळ असतो. इथे बसणाऱ्या प्रत्येक महिलेचा, तरुणाचा आणि वडीलधाऱ्यांचा काळ असतो. आपण वयाच्या पंचविशीपासून साधारणत: ७५पर्यंत उत्तम पद्धतीने काम करु शकतो.या वयात समाजासाठी काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असते."

त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना चोख उत्तर दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी रतन टाटा, अमिताभ बच्चन आणि सायरस पूनावासा यांच्या नावाचा उल्लेख करत, वय हा फक्त एक अंक असल्याचे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की," जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते, तेव्हा वडीलांबरोबर लेक असते. आपल्या वडीलांना म्हणायचं तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या, मग त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

SCROLL FOR NEXT