Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: "पत्रकारांची ताडोबात ट्रीप कधी काढायची?" सुप्रिया सुळेंनी शेयर केली 'ती' कविता, भाजपचे टोचले कान

Sandip Kapde

Supriya Sule: भाजपवर विरोधक चौफेर टीका करत आहे. याचे कारण म्हणजे नागपूरची झालेली तुंबई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकारांना धाब्यावर नेण्याचे वक्तव्य. यामुळे भाजप विरोधकांच्या कैचीत पकडल्या गेले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची एक कविता 'एक्स'वर शेअर करत भाजपवर उपहासात्मक टीका केली आहे.

नागपुरात शुक्रवारी रात्री पावसाने शहरातील जनजीवन ठप्प झाले होते. अवघ्या 4 तासात 100 मिमी पाऊस झाल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.

नागपुरात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे एका ५३ वर्षीय महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. मुंबईत पावसाचे पाणी साचल्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक भूमिका घेत असत मात्र आता नागपूर तुंबल्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीपूर्वी नकारात्मक प्रचार टाळण्यासाठी पत्रकारांना ढाब्यांवर नेण्यास आणि त्यांच्याशी चांगले वागण्यास सांगितले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपवर मीडियाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमध्ये मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना या सूचना दिल्याचे कळते.

हेरंब कुलकर्णी यांची कविता...

चला, आपण धाब्यावर जाऊ...

मी त्यांना म्हणालो
 पाण्यात तरंगणारे तुमचे
 नागपूर शहर आपण पाहू

ते म्हणाले
नको नको,
 त्यापेक्षा आपण,
 धाब्यावरच जाऊ.....!!!

धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
 दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले " हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?"

मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले .....

न्यायमूर्ती लोया नागपुरात,
 नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
 समोर मेन्यू कार्ड धरले ...

शेतकरी आत्महत्या भागात,
 दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा ,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या  ?

मी विचारले कंटाळून,
 अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
 तुम्ही गिफ्ट काय घेणार ?

कंटाळून विचारले शेवटी मी -

९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
 रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
 पत्रकारांची
 ताडोबात ट्रीप कधी काढायची ?

आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
 सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..

 - हेरंब कुलकर्णी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates: भाजपच्या पहिल्या यादीत 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का; गेम चेंजर ठरणार की..?

Vidhan Sabha जागांवरून मविआतील वाद विकोपाला? ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार? Maharashtra Politics

BJP Candidates List : भाजपच्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतून दोन आमदरांचा पत्ता कट... 'या' दिग्गजांना मिळाली संधी

फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील...भाजपच्या पहिल्या यादीनुसार कोण कुठून लढणार? वाचा संपूर्ण यादी

IND vs NZ: कर्णधार रोहितचा सर्फराजच्या शतकानंतर KL Rahul ला निर्वाणीचा इशारा? म्हणाला, 'त्यांना माहित आहे की...'

SCROLL FOR NEXT